आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

iPhone 13 vs iPhone 14:दोन्ही स्मार्टफोनमध्ये काय आहे फरक; डिस्प्ले, कॅमेरा आणि स्पेसिफिकेशन्स कोणत्या मोबाईलमध्ये आहे बेस्ट?

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅपलने नुकताच आपला नवीन iPhone 14 लाँन्च केले आहे. हा फोन गेल्या वर्षीच्या iPhone 13 सारखाच असून, या दोन्ही स्मार्टफोनमध्ये किंचितसा फरक पाहायला मिळतोय. सध्या फ्लिपकार्ट बिग बिलीयन डे सेल सुरू असून, त्यामध्ये iPhone 13 हा स्मार्टफोन 49,990 रुपयांत ग्राहकांना मिळणार आहे. तर iPhone 14 स्मार्टफोनची किंमत 79,900 पासून पुढे ठेवण्यात आली आहे . आज आपण iPhone 13 आणि iPhone 14 मधील फरक जाणून घेऊयात...

iPhone 13 vs iPhone 14 डिस्प्ले

आयफोन 13 आणि 14 मध्ये 6.1 इंचीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा 60 हर्ट्ज़ इतका आहे. या दोन्ही फोनमध्ये Retina XDR OLED डिस्प्ले पॅनल देण्यात आले आहे. याचा अर्थ असा की, या दोन्ही स्मार्टफोनमध्ये एकच प्रकारचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

iPhone 13 vs iPhone 14 डिझाइन

आयफोन 13 आणि आयफोन 14 सिरीजच्या फरकाबाबत बोलायचे झाले तर रियर कॅमेऱ्यातील मॉड्यूल डिझाइन वेग-वेगळी आहे. आयफोन 14 ला नव्या रंगात उपलब्ध करून देण्यात आले आहे.

iPhone 14 चे डाइमेंशन 146.7 x 71.5 x 7.8 मिलीमीटर आणि वजन 172 ग्रॉम आहे. तर आयफोन 13 चा डाइमेशन 146.7 x 71.5 x 7.7 मिलीमीटर आणि वजन 174 ग्रॉम इतके आहे. दोन्ही आयफोनमध्ये IP68 डस्ट देण्यात आला आहे.

iPhone 13 vs iPhone 14 Performance

आयफोन 13 आणि आयफोन 14 मध्ये अ‍ॅपलचा ए15 बायोनिक चिपसेट देण्यात आले आहे. मात्र या चिपसेटमध्ये किंचितसा फरक आहे. गेल्या वर्षी अ‍ॅपलने ए15 चिपसेटला दोन व्हेरियंटमध्ये लाँन्च केले होते. तसेच प्रो मॉडलला सध्या असलेल्या ए15 चिपसेटसह अतिरिक्त GPU कोरही देण्यात आले आहे.

नवीन आयफोन 14 मध्ये कंपनीने आयफोन 13 चाच ए15 चिपसेट दिले आहे. विशेष म्हणजे त्यासोबत अतिरिक्त GPU Core देण्यात आलेत. या दोन्ही फोनमध्ये iOS 16 देण्यात आले आहेत.

iPhone 13 vs iPhone 14 Camera

आयफोन 13 आणि आयफोन 14 मध्ये रिअर कॅमेरा ड्यूल-टोन फ्लॅश मॉड्यूलसह 12 मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेरे देण्यात आलेत. या कॅमेऱ्यातून 60 fps वर 4K व्हिडिओ रिकॉर्ड करता येऊ शकतो. दोन्ही फोनमध्ये अॅपला FaceID सिस्टमसह 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.

iPhone 13 vs iPhone 14 Battery

आयफोन 13 मध्ये 3230 mAh तर आयफोन 14 मध्ये 3279 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये एकसारखी चार्जिंग स्पीड, युएसबी पावर डिलीवरी 2.0, 15 W वर Qi वायरलेस चार्जिंग फिचर्स देण्यात आले.

iPhone 13 vs iPhone 14 Price

आयफोन 13 स्मार्टफोन 69,900 तर आयफोन 14 हा 79, 900 रुपयांना मिळणार आहे. मात्र, Flipkart Big Billion Days Sale वर आयफोन 13 हा 49,990 रुपयांत मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...