आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञान मार्गदर्शक:टू द पॉइंट ठेवा यूट्यूब व्हिडिओचा कंटेंट

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूट्यूबवर कंटेंट लोकप्रिय करणे कठीण आहे. कारण आता इथे उत्तम कंटेंट तयार करणाऱ्यांची रांग लागली आहे. अशा वेळी प्रश्न हा आहे की, तुम्ही तुमच्या व्युअर्सना असे काय द्याल, ज्यामुळे त्यांनी तुमचे व्हिडिओ पाहावेत व पुढच्या कंटेंटची प्रतीक्षा करावी? व्यूअर्सबाबत प्रामाणिकपणा पहिला नियम आहे. काही यूट्यूबर्स ज्या विषयावर व्हिडिओ बनवतात ते वॉच टाइम वाढवण्यासाठी कामाचा मुद्दा ताणून धरतात. यामुळे व्यूअर त्रस्त होतो आणि व्हिडिओ मध्येच सोडून देतो. अशा वेळी व्हिडिओ लहान व उपयुक्त बनवत टू द पॉइंट मांडण्याची गरज आहे. आपल्या व्हिडिओचा विषय निवडण्यापूर्वी संशोधन अवश्य करा. यासाठी कीवर्ड सर्च आणि व्यूअरची गरज लक्षात घ्या. ज्यांचा कुणीतरी शोध घेत आहे, असे विषय टाळा. तुम्ही इंटरअॅक्टिव्ह व्हिडिओ बनवत असाल तर संवाद स्पष्ट ठेवा. यूट्यूब इनसाइट्सचे विश्लेषण अवश्य करा. तुम्ही आपल्या कंटेंटच्या आकड्यांकडे लक्ष न देता हे काम करत असाल तर तुम्हाला याचे नुकसान झेलावे लागेल. चुकीची माहिती देऊ नका. शक्यतो आपल्या व्हिडओत कॉमेंट सेक्शन खुले ठेवा. यामुळे तुम्ही व्यूअर्सचे मत जाणून घ्याल आणि तुम्हाला तुमच्यातील उणीवा समजण्याची संधी मिळेल.

बातम्या आणखी आहेत...