आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • LAVA 5G । Lava First 5G Mobile Lauch In India, 128 GB Storage With 8 GB RAM, You Will Have To Pay Rs 19,999 To Get It

अखेर लावाचा पहिला अग्नि 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च:8 जीबी रॅमसह मिळणार 128 जीबीचे स्टोरेज, फोन घेण्यासाठी मोजावे लागणार 19,999 रुपये

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लावा इंटरनॅशनल या कंपनीने आपला पहिला 5G मोबाईल भारतात लॉन्च केले आहे. लावा अग्नि 5G असे मोबाईलचे नाव असून, या फोनमध्ये ग्राहकांना क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह 30 व्हॉटचे फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आले आहे.

फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच 8GB रॅम आणि 10 प्रिलोडेड कॅमेरा फिचर्सचा देखील समावेश आहे. लावा 5G ची टक्कर रियलमीच्या 8s 5G, मोटो G 5G आणि सॅमसंगच्या M32 5G या मोबाईल सोबत होणार आहे.

लावा अग्नि 5G ची किंमत 19,999 रुपये
कंपनीने लावा अग्नि या मोबाईलची किंमत 19999 रुपये इतकी ठेवली आहे. या फोन ग्राहकांना फक्त 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजमध्ये मिळणार आहे. येत्या 18 नोव्हेंबरपासून हा फोन अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि ऑफलाईऩ मार्केटमध्ये देखील मिळणार आहे. मात्र ग्राहक अमेझॉन आणि लावाच्या ई-स्टोरवरून या मोबाईलची बुकिंग करू शकता. त्यासाठी ग्राहकांना 500 रुपयांचे पेमेंट करावे लागणार आहे. त्यानंतर मोबाईल घेतल्यावर 2000 रुपयांची सूट देखील दिली जाईल असे कंपनीने म्हटले आहे.

लावा अग्निचे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले : लावा अग्नि 5G मध्ये HD+ LCD डिस्प्ले मिळणार आहे. त्यात 90 हर्ट्ज़ निट्ससह कॉर्निंग गोरिला ग्लासची सुरक्षा मिळणार आहे.
प्रोसेसर : स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी कंपनीने या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 810 SoC प्रोसेसर दिले आहे. हा 5G प्रोसेसर आहे. सोबतच 8GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. त्यात मेमेरी कार्ड देखील टाकता येऊ शकते.
सेल्फी 16 मेगापिक्सल : फोनचा रिअर कॅमेरा हा 64 मेगापिक्सल देण्यात आली असून, त्यात 5 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड आणि 2 मेगापिक्सल डेप्थ आणि 2 मेगापिक्सल माइक्रो पॅनेल कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सोबतच सेल्फीसाठी 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

फोनमध्ये 5000mAh बॅटरी
लावा अग्नि 5G मध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने 730 घंट्यांपर्यंत चालेल असा दावा केला आहे. तर 50 घंटे फोन कॉलसाठी, 25 घंटे व्हॉट्सअॅप आणि म्युसिकसाठी चालेल. असे म्हटले आहे. या सोबतच फास्ट चार्जिंग करीता 30 व्हॉटचे चार्जर देखील देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...