आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील पहिल्या रोलेबल टीव्हीची विक्री सुरू:LG चा हा टीव्ही 15 देशांमध्ये खरेदी करता येईल, स्क्रीनचा ब-याच प्रकारे होणार वापर; एका बॉक्समध्ये बंद असतो टीव्ही

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या टीव्हीची किंमत 88,500 डॉलर (सुमारे 64 लाख रुपये) इतकी आहे.

एलजी या कोरियन कंपनीने जगातील पहिल्या रोलेबल टीव्हीची विक्री सुरू केली आहे. त्याला सिग्नेचर टीव्ही देखील म्हटले जाते. टीव्हीमध्ये 65 इंचाची रोलेबल स्क्रीन आहे. टीव्ही ऑन होताच एका डॉकमधून स्क्रिन बाहेर येते आणि ऑफ केल्यानंतर डॉकमध्ये परत जाते. कंपनीने हा टीव्ही 3 वर्षांपूर्वी सादर केला होता.

हा टीव्ही कंपनीने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये दक्षिण कोरियाच्या बाजारात पहिल्यांदा लाँच केला होता. या टीव्हीची किंमत 88,500 डॉलर (सुमारे 64 लाख रुपये) इतकी आहे. कंपनीने सांगितल्यानुसार, त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरुन जगभरातील लोक हा टीव्ही खरेदी करु शकतील. सुरुवातीला अमेरिका, रशिया, जर्मनी आणि फ्रान्ससह 15 देशांमध्ये याची विक्री केली जाईल.

महसूलच्या बाबतीत एलजी ही जगातील दुसर्‍या क्रमांकाची कंपनी आहे. कंपनीकडे 16.5% मार्केट शेअर आहेत. त्याच वेळी, 31.9% मार्केट शेअरसह सॅमसंग प्रथम क्रमांकावर आहे.

एलजी रोलेबल टीव्हीची वैशिष्ट्ये

  • हा रोलिंग टीव्ही तीन वेगवेगळ्या मोडमध्ये कार्य करतो, ज्यामध्ये तीन प्रकारचे डिस्प्ले साइज उपलब्ध आहेत. कंपनीने हा टीव्ही डिझाइन करण्यासाठी खास तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
  • यूजरने आदेश दिल्यानंतरच एलजीचा हा नवीन टीव्ही दिसू शकेल, अन्यथा टीव्ही त्याच्या तळाशी असलेल्या बेसमध्ये जाईल. त्याच्या तीन मोडपैकी एक लाइन व्ह्यू मोड आहे ज्यामध्ये या टीव्हीचा केवळ एक चतुर्थांश भाग वरच्या बाजूस दिसतो. याचा यूजर घड्याळ, फोटो फ्रेम, मूड, संगीत आणि होम डॅशबोर्ड म्हणून वापर करु शकतात.
  • क्लॉक मोडमध्ये हे घड्याळासारखे कार्य करेल, फ्रेम मोडमध्ये यूजर यावर आपला फॅमिली फोटो लावू शकतील, जो स्मार्टफोनच्या मदतीने शेअर केला जाऊ शकतो आणि त्याच्या मूड मोडने घरात अधिक आरामदायक वातावरण तयार होईल. यूजरला या टीव्हीत ऑनस्क्रीन म्युझिक कंट्रोल मिळते, तसेच घरी इतर स्मार्ट गॅझेट देखील नियंत्रित करता येतील.
  • झिरो मोडमध्ये, संपूर्ण 65 इंचाचा टीव्ही बेसमध्ये जातो. झिरो मोडमध्ये, यूजर संगीत आणि ऑडिओचा आनंद घेऊ शकतील. यात 100 वॅटची डॉल्बी एटमोस ऑडिओ सिस्टम आहे.
  • फूल व्ह्यूमध्ये मोठ्या स्क्रीनचा संपूर्ण आनंद घेता येईल. टीव्हीमध्ये एलजीचा सेकंड जनरेशनचा अल्फा 9 इंटेलिजेंट प्रोसेसर बसविण्यात आला आहे.
  • अ‍ॅमेझॉन अलेक्सा फीचरच्या मदतीने व्हॉइसद्वारे हा टीव्ही कंट्रोल केला जाऊ शकतो. यात यूजरच्या सूचनांनुसार तो कार्य करतो. हा अॅपल एअरप्ले 2 आणि होमकिटला सपोर्ट करतो.
  • हा जगातील पहिला OLED टीव्ही आहे ज्याची स्क्रीन आपल्या बोलण्याने काम करते. यामध्ये पिक्सेल डिमिंग तंत्रज्ञानाचा वापर डिस्प्ले ऑप्टिमाइझ करण्यासाठी केला गेला आहे, जो सुमारे 3.3 दशलक्ष सेल्फ-इमिटिंग पिक्सेलला सपोर्ट करतो.
बातम्या आणखी आहेत...