आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान! चित्रपटाच्या लिंकद्वारे सायबर फसवणूक:काश्मीर फाइल्स चित्रपटाला गुन्हेगारांनी बनवले हत्यार, आपले बँक अकाउंट होऊ शकते हॅक; जाणुन घ्या यापासून कसा करावा बचाव

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवरील लिंकवर क्लिक करून सायबर फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. 'द काश्मीर फाइल्स' या नवीन चित्रपटाची लिंक डाउनलोड करण्याच्या बहाण्याने स्कॅमर व्हॉट्सअॅपवर असे मालवेअर पाठवू शकतात, जे तुमचे बँक खाते हॅक करू शकतात आणि तुमचे पैसे गायब केले जाऊ शकतात.

नोएडा पोलिस अधिकाऱ्यांनी मंगळवारी लोकांना सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर अज्ञात लोकांकडून पाठवलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करण्यापासून सावध केले. अधिका-यांनी सांगितले की, सायबर गुन्हेगार ऑनलाइन पेमेंट करण्याच्या बहाण्याने किंवा लोकप्रिय चित्रपट किंवा व्हिडिओमध्ये विनामूल्य उपलब्ध करुन देण्याच्या बहाण्याने अशा लिंक पाठवू शकतात, जेणेकरून यूजर्सचे फोन हॅक केले जातील. त्यांच्या मोबाइल नंबरशी लिंक असलेली बँक खाती रिकामी केली जाऊ शकतात.

व्हॉट्सअॅपवर आलेल्या चित्रपटाच्या लिंकवर क्लिक केल्यास फसवणूक होऊ शकते
अतिरिक्त उपायुक्त (नोएडा) रणविजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना माहिती मिळाली आहे की, 'द कश्मीर फाइल्स' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची लिंक शेअर करण्याच्या बहाण्याने सायबर फ्रॉड व्हॉट्सअॅपवर असे मालवेअर पाठवू शकतात.

सिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, चित्रपटाचे नाव वापरण्यात आले आहे असे कोणतेही विशिष्ट प्रकरण नाही, परंतु लोकांचे फोन हॅक करण्यासाठी किंवा पैशांची फसवणूक करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो. व्हॉट्सअ‍ॅपवर लोकांसोबत लिंक शेअर केल्याची अनेक प्रकरणे घडली आहेत, जिथे फोन यूजर्सने काही क्लिक केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातील रक्कम गायब झाली आहे.

तीन जणांचे 30 लाखांचे झाले नुकसान
अधिकाऱ्याने सांगितले की, अलीकडेच 24 तासांत एकाच पोलिस ठाण्यात तीन जणांच्या सायबर फसवणुकीच्या तक्रारी आल्या आहेत. ज्यामध्ये त्यांचे 30 लाखांचे नुकसान झाले आहे. कोणतीही ऑनलाइन फसवणूक झाल्यास त्यांनी लोकांना सायबर हेल्पलाइन 1930 किंवा 155260) वर त्वरित कॉल करण्यास सांगितले.

सायबर फ्रॉडपासून बचाव करण्याची पध्दत

  • जर या चित्रपटाशी संबंधीत एखादी लिंक तुमच्यासमोर आली तर त्यावर क्लिक करु नका.
  • या लिंकविषयी आपल्या जवळच्या लोकांनाही माहिती द्या.
  • या व्यतिरिक्त जर अशाच इतर काही लिंक तुमच्यासमोर येत असतील तर त्याची पहिले तपासणी करा.
  • बनावट लिंकविषयी तुम्ही जवळच्या सायबर सेल किंवा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करु शकता.
  • बँक खात्याशी संबंधीत माहिती लॉक करुन किंवा सुरक्षित करुन ठेवा.
  • जर लिंकवर क्लिक केले आहे आणि मोबाइल रिस्पॉन्समध्ये काही बदल दिसला तर तत्काळ फोन फॉर्मेट करा.
बातम्या आणखी आहेत...