आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • Maintain The Smartphone Like A Car, Replace The Battery After 3 Years, This Will Make It Last For 6 Years

सवयी बदला:स्मार्टफोनची गाडीप्रमाणे देखभाल करा, 3 वर्षांनी बॅटरी बदलून घ्या, असे केल्याने तो 6 वर्षांपर्यंत चालेल

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्टफोन आणि गाडीत अनेक साम्यं आहेत. एकदा गाडी खरेदी केल्यावर लोक दर महिन्याला त्याची सर्व्हिसिंग करतात पण फोन बिघडला तर तो बदलूनच टाकतात. जर स्मार्ट फोनची योग्य प्रकारे काळजी घेतली तर तो ६ वर्षांपेक्षा अधिक चालू शकतो. दुरुस्तीस होणार अधिकचा खर्च हे देखील फोन बदलण्याचे एक कारण होऊ शकते. परंतु एका अध्ययनातून हे समोर आले आहे की, ही माणसाची सवय आहे. २०२१ मध्ये डेल्फ्ट युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीने ६०० हून अधिक जणांचे सर्वेक्षण केले. त्या अधिकांशजणांनी संथ सॉफ्टवेअर आणि बॅटरी बिघडल्याने फोन बदलल्याचे सांगितले. युनिव्हर्सिटीच्या डिझाइनचे प्रोफेसर रूथ मुग म्हणतात, एक स्मार्टफोन केवळ तीन ते साडेतीन वर्षेच चालतो अशी लोकांची मानसिकता आहे, ही चुकीची आहे. वारंवार फोन बदलण्यापेक्षा आपल्या गाडीप्रमाणे त्याची वेळोवेळी सर्व्हिसिंग करा. तीन वर्षांत बॅटरी बदला. तसेच एक्सचेंज बोनस किंवा स्टोरमधील विविध योजनांना बळी न पडता आपला फोन बदलू नये. एक फोन कमीत कमी ७० प्रकारच्या विविध कंटेटच्याव्दारे बनवला जातो, ज्यात खूप प्रमाणात ऊर्जा खर्च झालेली असते. अधिकांश अशा देशात फोन बनवले जातात, जिथे अधिक प्रमाणात वीज बनवली जाते व अधिक प्रमाणात कार्बन उत्सर्जित होताे. अशा वेळेपूर्वी स्मार्टफोन बदलणे दोघांसाठी नुकसानीचे आहे.

केवळ १६ टक्केच लोक करतात फाेनची दुरुस्ती ग्राहक अहवालाच्या अध्ययनातून असे दिसून आले आहे की, जेव्हा स्क्रिन तुटल्यावर किंवा तडा गेल्यावरच फोन दुरुस्त केला जातो. २५% लोक फोन नादुरुस्त झाल्यावर दुरुस्तीऐवजी बदलण्यास पसंती देतात. केवळ १६% लोकच तो दुरुस्त करतात.

बातम्या आणखी आहेत...