आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनेकदा आपल्या ओळखपत्रावर कोणी तरी अन्य व्यक्ती सीमकार्ड घेऊन चालवत असतो. असे असताना ते सीमकार्ड आपल्या नावावर असून सुद्धा आपल्याला याची माहितीदेखील नसते किंवा कल्पनाही नसते. मात्र एखाद्याने जर आपल्या नावावरील सीमकार्डवरून चुकीचे काम केले तर उगीचच आपल्यावर कारवाई होऊ शकते. असे अनेक प्रकार आपण कित्येकदा चालता-बोलता अनेकांच्या तोंडातून ऐकलेच असेल.
मात्र आता भारत सरकारने याची दखल घेतली असून, तुमच्या ओळखपत्रावर( आधारकार्ड / मतदान कार्ड. इत्यादी) किती सीमकार्ड सुरू आहेत, याची माहिती आता मिळू शकणार आहे. टेलिकॉम नियमानूसार, एका व्यक्तिच्या आयडीवर जास्तीत जास्त नऊ सीमकार्ड घेतले जाऊ शकतात. मात्र जम्मू-काश्मीर, आसामसह उत्तर-पूर्व राज्यात एका आयडीवर जास्तीत जास्त सहा सीमकार्ड घेतले जाऊ शकतात.
नऊ पेक्षा जास्त सीम असणाऱ्यांवर दूरसंचार विभागाने कारवाई करण्याचे ठरवले आहे. ग्राहकांना दिलेल्या मर्यादेपेक्षाही जास्तीचे सीमकार्ड जर आढळले तर, त्या सर्व सीमकार्डाची KYC केली जाणार आहे. सात डिसेंबर रोजीच याचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. KYC साठी ग्राहकांना 60 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
तर इंटरनॅशनल रोमिंग, आजारी या ग्राहकांसाठी 30 दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. तुमच्या आयडीवर किती सीमकार्ड घेतले गेले आहेत? हे तुम्हाला माहिती आहे का? आज दिव्य मराठी डिजीटल तुम्हाला तुमच्या नावावर किती सीमकार्ड सुरू आहे, याची माहिती करून देणार आहे, चला तर मग...
तुमच्या नावावर किती सीमकार्ड सुरू आहे, का माहिती करून घ्यायचे
जर एखाद्याने तुमच्या ओळखपत्रावर सीमकार्ड घेतले आणि त्याने काहीतरी वाईट कृत्य किंवा गुन्हेगारी केली, तर उगीचच तुम्हाला दुसऱ्याने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागेल. जर टेलिकॉम कंपनीला देखील जर आपण सांगितले की माझ्यावर किती सीम सुरू आहेत, तरीही ते माहिती देत नाहीत. त्यामुळे आपल्या नावावर किती सीम सुरू आहे, कोणी आपल्या आयडीचा दुरुपयोग तर करत नाही ना? हे माहिती करून घेणे खूपच आवश्यक आहे.
तुमच्या आयडीवर किती सीमकार्ड रजिस्टर्ड
दूरसंचार विभागाने टेलिकॉम अॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अॅण्ड कंज्यूमर प्रोटेक्शन तयार केले आहे. त्यासाठी विभागाने tafcop.dgtelecom.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहेत. त्यात देशभरातील चालू सर्व मोबाईल क्रमांकाचा डेटाबेस अपलोड करण्यात आला आहे. त्याद्वारे फसवणूक रोखण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत. त्या माध्यमातून आपण आपल्या ओळखपत्रावर किती सीमकार्ड सुरू आहेत, याची माहिती मिळवू शकतो. विशेष म्हणजे आपल्या आयडीवर जर अन्य इतर व्यक्ती सीमकार्ड वापरत असेल, तर त्याची तक्रार देखील आपण करू शकतो. त्यासाठी फक्त 30 सेंकदाचा वेळ लागणार आहे.
आता आपण स्टेप बाय स्टेप फॉलो करूया
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.