आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • Marathi News | Tech | Top WhatsApp Features Launched In 2021: Check Full List From Multiple Device Support To Group Voice Video Call Limit Increased

कामाची बातमी:एक, दोन नव्हे, तर व्हॉट्सअ‍ॅपने या वर्षभरात 10 फिचर्स केले लाँच; हे सर्व फिचर्स कसे वापरायचे जाणून घ्या...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर आघाडीवर असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप नेहमी ग्राहकांच्या आवडी-निवडीनूसार बदल करत असतो, जगभरात व्हॉट्सअ‍ॅपचे 250 कोटींपेक्षा जास्त वापरकर्ते आहे आहे. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे युजर्स एसएमएस व्हिडिओ आणि फोटोजसह वॉइस आणि व्हिडिओ कॉल तसेच लोकशनसारख्या सेवेचे देखील आनंद घेऊ शकतात. ग्राहकांच्या आवडी-निवडीचा विचार करत नेहमी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये बदल पाहायला मिळतात. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये यावर्षी देखील अनेक बदल पाहायला मिळले आहेत. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपमध्ये काय आहे खास याची माहिती देणार आहोत.

1. व्हॉट्सअ‍ॅप फ्लॅश कॉल
हा फिचर युजर्सच्या एक्सपीरिएंसला सुरक्षित ठेवण्याचा काम करतो. व्हॉट्सअ‍ॅपला व्हेरिफिकेशनसाठी आपण एसएमएस ऐवजी आपण फ्लॅश ऑटोमेटेड कॉल व्दारे व्हेरिफिकेश करू शकता. तुम्ही जेव्हा व्हॉट्सअ‍ॅपचे रजिस्ट्रेशन करता तेव्हा व्हॉट्सअ‍ॅप फ्लॅश कॉल एसएमएस व्हेरिफिकेश या पर्यायाला ऑन करून टाका.

2. मल्टिपल डिव्हाइस सपोर्ट
व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी नुकतेच मल्टी-डिवाइस फिचर लॉन्च केले आहे. या पर्यायामुळे एक व्हॉट्सअ‍ॅप चार डिव्हाइसमध्ये कनेक्ट करू शकता. याचा आनंद युजर्स लॅपटॉप किंवा संगणकावर घेऊ शकता.

3. मिस्ड ग्रुप कॉल्स फिचर
या फिचरमुळे यूजर्स मिस्ड ग्रुप कॉलमध्ये सहभागी होऊ शकतात. या मदतीने, सहभागी जोडण्यासाठी संपूर्ण ग्रुप कॉल रीस्टार्ट करण्याची गरज नाही. ज्यांना आधीच सुरू असलेल्या कॉलमध्ये सामील व्हायचे आहे ते, कॉलमध्ये सामील होण्यासाठी त्यांच्या 'व्हॉट्सअ‍ॅप कॉल लॉग'वर जाऊ शकतात. यासाठी, तुम्हाला कॉल डिटेल स्क्रीन ओपन करावी लागेल आणि नंतर सामील होण्यासाठी 'जॉइन' वर टॅप करावे लागेल.

4. डिसअपियरिंग मोड
ही एक नवीन प्रायव्हसी सेटिंग आहे, सध्या ही सेटिंग बीटा यूजर्ससाठी उपलब्ध करण्यात आली आहे. याला सेंटिंगला सुरू करताच यूजर्सच्या सर्व चॅटींग गायब होते.

5. व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट
व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटही ऑनलाईन पेमेंट प्रणाली व्हॉट्सअ‍ॅपने सुरू केली असून, त्याद्वारे पैशांची देवाण-घेवाण होते. अनेक जण आता व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट प्रणालीचे देखील वापर करताना पाहायला मिळत आहे.

6. व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडव्हॉन्स सर्च व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडव्हॉन्स सर्च या फिचरला युजर्स टेक्ट, फोटो, Gif, व्हिडिओ, ऑडिओ, डॉक्यूमेंट आणि लिंकसोबत सर्चला फिल्टर करण्याचा पर्याय मिळतो. याचा उपयोग सर्च बटनावर क्लिक करून केला जाऊ शकतो. जे वरच्या बाजूने देण्यात आले आहे.

7. व्हॉट्सअ‍ॅप डार्क मोड
व्हॉट्सअ‍ॅपमध्ये डार्क मोडचे पर्याय देण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या डिस्पेसाठी हा डार्क मोड काम करू शकतो. या फिचरव्दारे ग्राहकाच्या डोळ्याचे काही प्रमाणात संरक्षण होते, सोबतच मोबाईलची बॅटरी देखील कमी खर्च होते. डार्क मोडला सुरू करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सेटिंगमध्ये जाऊन चॅटचे पर्याय निवडा त्यानंतर थीम्सवर जा तिथे तुम्हाला लाइट, डार्क आणि सिस्टम डिफॉल्ट असे पर्याय मिळतील. तुम्हाला जो हवा असेल ते निवडा.

8. ग्रुप व्हाइस-व्हिडिओ कॉलची लिमिट वाढली

व्हॉट्सअ‍ॅपने ग्रुप व्हाइस-व्हिडिओ कॉलिंगची संख्या वाढवून आता 8 केली आहे. पूर्वी चार जणांनाच व्हाइस-व्हिडिओ कॉलिंगचा आनंद घेता येत होता. आता त्याची संख्या वाढवली असून, अॅड्राईड आणि आयओएस ग्राहक याचा आनंद घेऊ शकणार आहे.

9. स्टोरेज मॅनेजमेंट टूल्स

व्हॉट्सअ‍ॅपने ग्राहकांसाठी स्टोरेज मॅनेजमेंट टूल्स हे नवीन फिचर लॉन्च केले आहे. याद्वारे ग्राहक मॅनेजमेंट स्टोरेजचा वापर करून फोटो, व्हिडिओ किंवा अन्य फाइल्सला चेक करून डिलीट करू शकता. यूजर्स आपल्या पर्सनल चॅटीग किंवा मीडियाला स्वत: कधीही डिलीट करू शकतात.

10. स्टिकर फिचर
व्हॉट्सअ‍ॅपवर आता आपण आपल्या फोटोचे देखील स्टीकर तयार करू शकतो. त्याचा आनंद घेण्यासाठी ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅप वेबचे वापर करावे लागणार आहे. त्यासाठी एक फोटो निवडून क्रॉप करून एडिट करत आपण समोरच्या व्यक्तिला आपल्या फोटोचा स्टीकर देखील पाठवू शकता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...