आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेक्नो नॉलेज:इंटरनेट सर्फिंग सोपे करेल मायक्रोसॉफ्ट एज

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मायक्रोसॉफ्ट आपले नवीन इंटरनेट ब्राउजर एजला सातत्याने उत्कृष्ट बनवण्यासाठी त्यात नव्या वैशिष्ट्यांची भर घालत आहे. ही नवी वैशिष्ट्ये या ब्राउजरला केवळ अधिक उपयुक्तच बनवत नाही तर त्यामुळे तुमचे कामही सोपे होईल. त्याची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात. -साइडबार : मायक्रोसॉफ्ट एजने आपल्या होमपेजवर एक साइडबार ऑफर केले आहे. येथे तुम्ही आउटलूक, ऑफिस आणि डिस्कव्हरच्या वैशिष्ट्यांची सर्फिंग नवीन विंडो किंवा टॅब न उघडता सहजपणे करू शकता. -स्लीपिंग टॅब्स : काॅम्प्युटर किंवा लॅपटॉपचे परफॉर्मंस आणखी चांगले करण्यासाठी एज ब्राउजरने स्लीपिंग टॅब्स हे फीचर दिले आहे. तुम्ही सध्या ज्या टॅब्सचा वापर करत नाही ते या फिचरद्वारे स्लीप मोडवर टाकले जातात. -कूपन डील्स : ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर पैसे वाचवण्यासाठी एज तुमची मदत करू शकतो. शॉपिंगच्या दरम्यान उत्पादनावर वेबसाइटकडून दिले जाणारे कूपन हे फीचर वेबमधून शोधून ते तुमच्या समोर आणतो. यासोबतच कॅशबॅक मिळत असेल तर त्याचीही सूचना तो तुम्हाला देईल. -मायक्रोसॉफ्ट स्टार्ट : मायक्रोसॉफ्ट स्टार्ट होमपेजवर उपलब्ध आहे. तो तुम्हाला बातम्यांचे अपडेट देतो. यासोबतच तो तुम्हाला आरोग्याच्या टिप्स आणि सामन्यांचा स्कोअरही सांगतो. याशिवाय याच्या साह्याने तुम्ही हवामानाचा अंदाज आणि वाहतुकीची माहितीही जाणून घेऊ शकता.

बातम्या आणखी आहेत...