आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटो E40 लो-बजट स्मार्टफोन लाँच:दिवाळीच्या तोंडावर मोटोचा दमदार स्मार्टफोन बाजारात, ग्राहकांना मिळणार 'हे' फिचर्स

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीच्या तोंडावर आता अनेक मोठ-मोठ्या कंपन्या आप-आपले अडव्हॉन्स मोबाईल लाँच करत आहे. मोटोरोलाने देखील आज आपला E सिरीजचा E40 हा मोबाईल भारतात लाँच केला आहे. हा फोन ग्राहकांना 90Hz डिस्प्ले आणि ट्रिपल रिअर कॅमेरासोबत मिळणार आहे. तसेच 64GB चा स्टोरेज देखील देण्यात आला आहे. ग्राहकांच्या आवडीसाठी यामध्ये दोन कलर कंपनीने उपलब्ध करून दिले आहे. भारतात मोटोच्या या मोबाईल समोर रियलमी c21y आणि सॅमसंग M12 आणि इनफिनिक्स हॉट हे मोठे आवाहन आहे.

मोटो E40 ची किंमत असणार 9,499 रुपये
मोटो E40 या मोबाईल सोबत ग्राहकांना 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज भेटणार आहे. त्यासाठी ग्राहकांना 9,499 रुपये मोजावे लागणार आहे. कार्बन ग्रे आणि पिंक ग्रे असे दोन्ही कलर ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. 17 ऑक्टोंबरपासून हा फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे.

मोटो E40 मध्ये हे असणार स्पेसिफिकेशन

  • या फोनमध्ये HD+ (720x1,600) चा 6.5 इंच स्किन देण्यात आली आहे. हा मोबाईल अॅड्रॉइड 11 च्या MyUX या सिस्टीमवर चालणार आहे.
  • फोनच्या पाठीमागे फिजिकल फिंगर प्रिंट सेंसर देण्यात आला आहे. सोबतच फेस अनलॉकची सुविधा देखील यात देण्यात आली आहे.
  • Unisoc T700 SoC सोबत 4GB ऑप्शन देण्यात आला आहे.
  • सोबतच इतर मोबाईल प्रमाणे यात देखील ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 48 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा पोट्रेट मोड, पॅनोरमा, फेस ब्युटी, HDR नाइट व्हिजनस आणि सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सलसह अनेक सुविधा देण्यात आल्या आहे.
  • फोनमध्ये ग्राहकांना 5000 mAh बॅटरीची दमदार बॅटरी मिळणार आहे.
  • मोटो E40 हा 4G LTE, Wi-Fi,ब्लूटूथ, FM रेडियो आणि USB टाइप-C चार्जर देण्यात आले आहे.
  • मोटो E40 चा वजन अवघे 198 ग्राम इतका आहे
बातम्या आणखी आहेत...