आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे प्रशासन कार व इतर वाहनांतून होणाऱ्या उत्सर्जनावर कठोक मर्यादा घालणार आहे. २०३२ पर्यंत देशात विकल्या जाणाऱ्या सर्व प्रवासी वाहनांपैकी ६७% इलेक्ट्रिक कार असतील, असे याच्याशी संबंधितांनी सांगितले. हे आधीच्या उद्दिष्टापेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षी अमेरिकेत विकल्या गेलेल्या सर्व वाहनांपैकी केवळ ५.८% वाहने इलेक्ट्रिक होती. २०३० पर्यंत देशात विक्री होणाऱ्या निम्म्या कार इलेक्ट्रिक व्हाव्यात, अशी इच्छा बायडेन यांनी यापूर्वी व्यक्ती केली होती.
नवे लक्ष्य साध्य करण्यासाठी बायडेन सरकार लवकरच कायदा आणणार आहे. युरोपियन युनियनने आधीच वाहन उत्सर्जनासाठी कठोर मानके केली आहेत. याअंतर्गत २०३५ पर्यंत पेट्रोल, गॅसोलीनवर चालणाऱ्या सर्व वाहनांची विक्री बंद होईल. कॅनडा, ब्रिटननेही अशी मानके ठरवून दिली आहेत. अमेरिकेतील प्रस्तावित कायदा वाहन उत्पादकांना कठीण आव्हान देईल. जवळजवळ प्रत्येक मोठ्या कार कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांत मोठी गुंतवणूक केली आहे. पर्यावरण संरक्षण एजन्सी (ईपीए) चे प्रमुख मायकेल रेगन बुधवारी वाहनांतून उत्सर्जनासाठी नवीन मानकांची घोषणा करू शकतात. या अंतर्गत २०३२ पर्यंत सर्व नवीन कारविक्रीत इलेक्ट्रिक कारचा वाटा ६४ ते ६७% असेल. नवीन लक्ष्यासमोर अनेक अडथळे असतील. लाखो नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स बांधावी लागतील. या चार्जर्सच्या गरजेनुसार पॉवर ग्रीडमध्ये सुधारणा करावी लागेल. बॅटरीसाठी आवश्यक खनिजांच्या पुरवठ्यासाठी व्यवस्था करावी लागेल. प्रस्तावित कायद्याला न्यायालयात आव्हानही दिले जाऊ शकते. २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीतही हा मुद्दा येऊ शकतो. इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे वाहन उद्योगात मोठ्या प्रमाणात रोजगार कमी होणार आहे. हे ऑटोमोबाइल उद्योगातील पूर्णपणे बदलाप्रमाणे असेल, असे प्रमुख अमेरिकन आणि परदेशी वाहन उत्पादकांची संघटना ऑटोमोटिव्ह इनोव्हेशन अलायन्सचे अध्यक्ष जॉन बोझेला म्हणतात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.