आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Tech auto
 • New Year 2022 | Marathi News | How To Make WhatsApp Stickers With Your Name & Photo For New Year 2022

स्वत:चा फोटो स्टीकर:व्हॉट्सअ‍ॅप्सवर आपल्या नावाने किंवा फोटो स्टीकरने म्हणा 'हॅप्पी न्यू ईयर' जाणून घ्या

एका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक

आज Happy New Year 2022 असून अनेक जण एकमेकांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहे. व्हॉट्सअ‍ॅप्सवर देखील आपण आपल्या फोटोचे स्टीकर तयार करुन एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊ शकतात. मात्र व्हॉट्सअ‍ॅप्सवर स्टीकर नेमके कसे तयार करायचे हे अनेकांना माहिती नाही. चला तर मग आपण व्हॉट्सअ‍ॅप्सवर नवीन फोटो स्टीकर कसे तयार कारायचे जाणुन घेऊया.

फक्त दोन अ‍ॅप्सची गरज
व्हॉट्सअ‍ॅप्सवर आपल्या नावाचे किंवा फोटोचे स्टीकर बनावण्यासाठी आपल्याला दोन अॅप्स घ्यावी लागणार आहेत. Background Eraser आणि Personal stickers for WhatsApp हे दोन अॅप्स सुरुवातीला आपल्याला इंस्टॉल करावे लागणार आहे. अ‍ॅड्राइंड युजर्स या अ‍ॅप्सला गुगल प्ले स्टोरवरुन इंस्टॉल करु शकता.

असे बनवा स्टीकर

 • Background Eraser या अ‍ॅप्सच्या मदतीने आपण हव्या असलेल्या त्या फोटोचे बॅकग्राऊंड हटवू शकतो. या अ‍ॅप्समध्ये आपल्याला फोटोसोबत इरेझ करण्याचे देखील पर्याय देण्यात आले आहे. फोटो बॅकग्राऊंडला ऑटो, मॅनुअल, मॅजिक, रिपेअर टुल्सच्या मदतीने इरेझ करता येते. फोटो इरेझ केल्यानंतर त्याला सेव करुन घ्यावे.
 • जर अ‍ॅप्समध्ये फोटोचे बॅकग्राऊंड डिलीट होत नसेल तर, तुम्ही त्याला फोटोशॉप किंवा इतर अ‍ॅप्समध्ये इरेझ करू शकता. किंवा WWW.remove.bg या वेबसाइटवर जाऊऩ देखील आपण बॅकग्राऊंडला हटवू शकता. त्यानंतर फोटोला PNG फॉर्मेटमध्ये सेव्ह करुन घ्यावे.
 • आता Personal stickers for WhatsApp हे अॅप्स ओपन करा. येथे तुम्हाला PNG फॉर्मेटमधील सर्व फाइल दिसतील. त्यानंतर फोटोला ADD करा. त्यानंतर समोर एक मिनी विंडो आली असेल. त्यानंतर पुन्हा एकदा ADD बटन दाबा. त्यानंतर तुमचे व्हॉट्सअॅप्स स्टिकर्स तयार झालेले असेल.

स्टीकर असे पाठवा

 • स्टीकर पाठवण्यासाठी सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅप्स वर जा. त्यानंतर ज्याला पाठवायचे आहे, त्याचा संपर्क ओपन करा.
 • त्यानंतर टाइपिंग करताना खाली स्माइलीचा पर्याय आला असेल.
 • सगळ्यात शेवटी खाली तिथे स्माइली GIF स्टीकरचा लोगो दिसत असेल.
 • त्यानंतर तुम्हाला हवा असलेला तुमचा स्टीकर सिलेक्ट करा. आणि पाठवा.
बातम्या आणखी आहेत...