आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकियाचा नवीन फिचर फोन लाँच:एकदा चार्ज केल्यानंतर 8 तास मिळणार बॅटरी बॅकअप; किंमत 4 हजारांपेक्षाही कमी, जाणून घ्या...

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

HMD Global ने नोकियाचा नवीन फिचर फोन Nokia 8120 4G भारतात लाँच केला आहे. हा फिचर फोन विंटेज डिझाइनचा असून यामध्ये फ्लॅशलाइट आणि वायरलेस एफएम रेडिओ प्रदान करण्यात आला आहे. फोनच्या चार्जिंगचा जर विचार केला तर हे स्टँडबाय टाइमवर 27 दिवसांचा बॅटरी बॅकअप देतो. 8120 4G फोनची खासियत म्हणजे तो VoLTE नेटवर्क कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो.

नोकिया 8120 4G ची किंमत

नोकिया 8120 4G ची किंमत 3999 रुपये असून, हा मोबाईल निळ्या आणि लाल रंगामध्ये ग्राहकांना मिळणार आहे. त्यासाठी ग्राहकांना अमेझॉन आणि नोकिया इंडिया ऑनलाईन स्टोरवर जावे लागेल.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स

  • नोकियाच्या या मोबाईलमध्ये 240x320 पिक्सल रेजोल्यूशनसह 2.8 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये सिंगल-कोर 1GHz युनिसोक T107 चे प्रोसेसर देण्यात आले आहे. सोबतच तुम्हाला 4GB रॅम आणि 128 MB इंटरनल स्टोरेज देखील मिळणार आहे.
  • नोकिया या मोबाईलमध्ये तुम्ही 32GB पर्यंत मायक्रो एसडी कार्ड म्हणजे मेमरी कार्ड टाकू शकता. सोबतच तुम्हाला दोन्ही सिम कार्डाचा आनंद देखील घेता येणार आहे. S30+ या ऑपरेटिंग सिस्टीमवर हा मोबाईल चालतो. फोटो काढण्यासाठी या मोबाईलमध्ये VGA रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबत वायरलेस FM रेडिओ, MP3 प्लेअर आणि टॉर्चलाईट देण्यात आले आहे.
  • नोकियाच्या या फिचर फोनमध्ये ग्राहकांना 1450 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 2G इंटरनेट वापरत असताना त्याची बॅटरी सुमारे आठ तास चालेल. मात्र, जर तुम्ही 4G इंटरनेट कनेक्टिविटी वापरत असाल तर याची बॅटरी आठ तासांपेक्षा कमी चालेल, असेही कंपनीने स्पष्टपणे म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...