आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • Nokia Tablets । HMD Global Finally Launches Its First Android Nokia T20 Tablet In India, Priced From Rs 15,499

नोकियाचा पहिला अँड्राईड टॅब्लेट:अखेर HMD ग्लोबलने आपल्या पहिल्या अँड्राईड नोकिया T20 टॅब्लेटला भारतात केले लॉन्च, 15,499 रुपयांपासून असणार किंमत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

HMD ग्लोबलने आपल्या नोकिया T20 टॅब्लेटला अखेर भारतात लॉन्च केले आहे. विशेष म्हणजे नोकिया कंपनीचा हा पहिलाच अँड्राईड टॅब्लेट आहे. त्यात 2K डिस्प्ले सोबतच 8,200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही बॅटरी 15 तास वेब ब्राउझिंद करू शकते. सोबतच या टॅब्लेटमध्ये स्टीरियो स्पीकर देखील देण्यात आले आहे. कंपनीने या आपल्या अनोख्या टॅब्लेटसाठी तीन वर्षाची सिक्युरिटी देखील दिली आहे.

नोकिया T20 टॅब्लेटची किंमत
या टॅब्लेटला कंपनीने तीन वेगवेगळ्या प्रकारे तयार केले असून, ज्यात दो वाय-फायसह एक सिम कार्डची सुविधा देण्यात आली आहे. वाय-फायच्या टॅब्लेटमध्ये 3GB रॅमसह 32GB स्टोरेज देण्यात आले आहे. कंपनीने त्याची किंमत 15,499 रुपये इतकी ठेवली आहे. तर आणखी एका वाय-फायच्या टॅब्लेटमध्ये 4G रॅमसह 32GB स्टोरेज मिळणार आहे.

त्याची किंमत 16,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4G मॉडेलसाठी ग्राहकांना 18,499 रुपये मोजावे लागणार आहे. हा टॅब्लेट बाजारात 2 नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहे. यासाठी ग्राहकांना कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईट nokia.com या सह ऑफलाइन स्टोर आणि फ्लिपकार्टवरून देखील खरेदी करता येणार आहे.

नोकिया T20 चे स्पेसिफिकेश

  • नोकिया चा हा टॅब्लेट अँड्राईड प्रणाली 11 वर कार्यरत आहे. टॅब्लेटमध्ये 10.4 इंच 2K (2,000x1,200 पिक्सेल) चे डिस्प्ले देण्यात आले आहे. ज्याची ब्राईटनेस सुमारे 400 निट्स असणार आहे. सोबतच टॅब्लेटमध्ये ऑक्टा-कोर Unisoc T610 चा प्रोसेसरसह 4GB रॅम देण्यात आली आहे. सेल्फी कॅमेरा मात्र कमी असून 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे तर रिअर कॅमेरा हा 8 मेगापिक्सलचा असणार आहे. चांगल्या फोटोग्राफीसाठी यात LED फ्लैश देखील देण्यात आला आहे. डबल मायक्रोफोनसह स्टीरियो स्पीकर देण्यात आले आहे.
  • या टॅब्लेटमध्ये 32GB आणि 64GB असे दोन प्रकारच्या स्टोरेजची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे. त्यात सुमारे 512GB पर्यंत मायक्रो SD कार्ड देखील लावता येऊ शकतो. कनेक्टिविटीसाठी यात 4G सह Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ, USB Type-C आणि 3.5mm ऑडियो जॅक देखील देण्यात आला आहे. सोबतच 8,200mAh ची बॅटरी देण्यात आली असून, त्याला चार्ज करण्यासाठी 15W चे फास्ट चार्जर देण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...