आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञान:मोबाइल, लॅपटॉपसाठी आता असेल एकच चार्जर

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात मोबाइल, टॅबलेट, लॅपटॉपसाठी एकच चार्जर असेल. ‘एक देश एक चार्जर’बाबत मोबाइल कंपन्यांमध्ये यूएसबी टाइप-सी चार्जरवर सहमती झाली आहे. त्यात अॅपल डिव्हाइसचाही समावेश आहे. त्यामुळे अॅपलला चार्जिंग केबलमध्ये बदल करावा लागेल. सुरुवातीस काही मोबाइल निर्मिती कंपन्यांनी या संकल्पनेस विरोध केला होता. मात्र आता त्यावर सहमती झाली आहे. भारताच्या आधी युरोपियन युनियनमध्ये कॉमन स्टँडर्ड चार्जर म्हणून यूएसबी टाइप-सी चार्जरला मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे वर्ष २०२४ च्या मध्यापर्यंत सर्व स्मार्टफोनसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट अनिवार्य करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...