आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Adminचे आता ग्रुपवर असणार नियंत्रण:व्हॉट्सअप ग्रुपमधील सदस्याचा व्हिडिओ, फोटो हटवण्याचा अधिकार, प्रक्रिया घ्या जाणून

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हॉट्सअप ग्रुप अ‌ॅडमिनसाठी एक नवीन फिचर घेऊन येत आहे. कंपनीने एका अहवालात जाहीर केले आहे की, आता व्हॉट्सअप ग्रुप अ‌ॅडमिन ग्रुपमधील कोणत्याही सदस्याचा संदेश, फोटो हटवू शकतो. त्यामुळे एका अर्थाने ग्रुपमधील व्हिडिओ, मेसेजवर अ‌ॅडमिनचे नियंत्रण राहणार आहे. हे फिचर वैयक्तिक वापराबरोबरच आता ग्रुपवर देखील लागू होणार आहे.

हे नवीन फिचर तुमच्या व्हॉट्सअपमध्ये काम करते की नाही. हे जाणून घेण्यासाठी तुम्ही ज्या ग्रुपचे अ‌ॅडमिन आहात, त्या ग्रुपमधील संदेश डिलीट करण्याचा प्रयत्न करा. डिलीट फॉर एव्हरी वन आले तर समजा की हे फीचर तुमच्या व्हॉट्सअपवर उपलब्ध आहे.

'अ‌ॅडमिन डिलीट' असे नवीन फिचरचे नाव
व्हॉट्सअपच्या नवीन फिचरचे नाव आहे Admin Delete. हे फीचर व्हॉट्सअपच्या अँड्रॉइड 2.22.17.12 बीटा व्हर्जनवर रिलीज होणार आहे. व्हॉट्सअपच्या अपडेट्सवर नजर ठेवणाऱ्या Wabitinfo पोर्टलनेही एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये म्हटले की, व्हॉट्सअप ग्रुप अ‌ॅडमिनला ग्रुपमधील कोणताही संदेश, व्हिडिओ डिलीट करण्याची परवानगी दिली जाणार आहे. हे नवीन वैशिष्ट्य सुरूवातीला काही भाग्यवान ग्रुप अ‌ॅडमिनलाच दिले जाणार आहे.

ग्रुप अ‌ॅडमिनला काय होईल फायदा
अ‌ॅडमिन डिलीट फीचरच्या वैशिष्ट्याने व्हॉट्सअप ग्रुपच्या प्रमुखाला आपल्या ग्रुपवर नियंत्रण ठेवता होईल. ग्रुप अधिक चांगल्या पद्धतीने चालविता येईल. मात्र, सदस्यांचा मेसेज डिलीट केल्यास चॅटमध्ये ग्रुप अ‌ॅडमिनचे नावही दिसेल. यामुळे प्रत्येकाला कळेल की, हा संदेश ग्रुप अ‌ॅडमिननेच डिलीट केला आहे. येथे तुम्ही प्रत्येकासाठी कोणताही संदेश कसा हटवायचा ते पाहू शकता. फक्त या सोप्या चरणांचे अनुसरण करा.

'डिलीट फॉर एव्हरीवन'ची प्रक्रिया घ्या जाणून

  • व्हॉट्सअप उघडा आणि चॅटमध्ये जा. तुम्हाला डिलीट करायचा असलेल्या मेसेजवर जा.
  • आता तो संदेश निवडण्यासाठी थोडा वेळ टॅप करा.
  • तुम्हाला आणखी संदेश हटवायचे असल्यास, टॅप करा आणि ते संदेश देखील निवडा.
  • संदेश निवडल्यानंतर, वरच्या बाजूला असलेल्या डिलीट म्हणजेच डस्टबिन चिन्हावर टॅप करा.
  • डिलीट आयकॉनवर टॅप केल्यानंतर, प्रत्येकासाठी ( 'डिलीट फॉर एव्हरीवन') हटवा निवडा.
  • यानंतर व्हॉट्सअॅप मेसेज डिलीट होईल.

प्रत्येकासाठी हटवण्याचा अर्थ
WhatsApp मेसेज डिलीट करण्यासाठी काही पर्याय देते. यापैकी एक पर्याय प्रत्येकासाठी डिलीट आहे. डिलीट फॉर एव्हरी वन सह, तुम्ही स्वतः पाठवलेला कोणताही संदेश तुम्ही हटवू शकता. याचा फायदा असा आहे की प्रत्येकासाठी डिलीट केल्यानंतर, तुम्ही किंवा कोणताही वापरकर्ता तुमचा डिलीट केलेला मेसेज पाहू शकत नाही. वैयक्तिक चॅटिंगशिवाय हे फीचर ग्रुपवरही काम करते.

'कीप मेसेज'वरही काम सुरू
व्हॉट्सअप एका नवीन फीचरवर काम करत आहे. ज्यामुळे वापरकर्ता गायब होणारे मेसेज जतन (save) करू शकतात. या नवीन फीचरची सध्या चाचणी सुरू आहे.
तुम्ही गायब झालेला मेसेज पाठवता तेव्हा, ठराविक वेळेनंतर मेसेज आपोआप हटवला जातो. पण कधी-कधी तुमच्याकडे हे फीचर चालू असताना तुम्ही तातडीचा ​​मेसेज पाठवता आणि मग हा मेसेजही गायब होतो. अशा वेळी व्हॉट्सअॅप लवकरच 'कीप द डिसपिअरिंग मेसेज' नावाचे फीचर आणणार आहे, ज्यामुळे तुम्हाला महत्त्वाचे मेसेज सेव्ह करता येतील.

घोटाळे टाळण्यासाठी नवीन वैशिष्ट्य
व्हॉट्सअपचे पेमेंट फिचर अधिक सुरक्षित करण्यासाठी कंपनीने नवीन युजर सेफ्टी कॅम्पेन आणले आहे. व्हॉट्सअपने 26 जुलै रोजी व्हॉट्सअपद्वारे पेमेंट करण्यासाठी वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी मोहीम सुरू केली आहे. त्याला 'घोटाळे से बचाओ' असे म्हटले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ऑनलाइन पेमेंट करताना, वापरकर्त्यांना व्हिडिओद्वारे जागरूक आणि माहिती दिली जाईल.

बातम्या आणखी आहेत...