आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Tech auto
 •  OnePlus 9RT | Marathi News | With 50 Megapixel Triple Cameras, OnePlus Buds Z2 Launched In India: Price, Specifications

वनप्लस 9RT फोन लॉन्च:वनप्लस 9RT मध्ये मिळणार 50 मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा; 4500mAh ची बॅटरीसह मिळणार 256GB स्टोरेज

8 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

वनप्लस 9RT ला अखेर भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये एक क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 SoC ची लेंन्स देण्यात आली आहे. ही लेंन्स 50 मेगापिक्सल ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला देखील सपोर्ट करते. या सोबत कंपंनीने वनप्लस बड्स Z2 वायरलेस स्टीरियो एयरबड्स देखील लॉन्च करण्यात आले आहेत. या एयरबड्समध्ये नॉइस कॅन्सिलेशन फीचर देण्यात आले आहे.

वनप्लस 9RT ची किंमत

भारतीय बाजारात वनप्लस 9RT 8GB+128Gb ची किंमत 42, 999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. आणि 12GB+256GB साठी आपल्याला 46,999 रुपये मोजावे लागतील. सोबत ग्राहकांना मोबाईलमध्ये दोन कलर देखील देण्यात आले आहेत. त्यात काळा आणि सिल्वर कलर प्रदान करण्यात आला आहे. या स्मार्टफोनला खरेदी करण्यासाठी अॅमेझान आणि कंपनीची ऑफिशियल साईटवर जावे लागेल. अॅमेझानच्या ग्रेट इंडियन रिपब्लिक डे सेलदरम्यान या स्मार्टफोनची विक्री केली जाणार आहे.

वनप्लस 9RT चे स्पेसिफिकेशन्स

 • हा मोबाईल अॅड्राईड 11 या प्रणालीवर चालतो. त्यात वनप्लस 9RT चा एक ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे.
 • वनप्लस 9RT मध्ये आपल्याला 6.62 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेचा सॅपलिंग टच हा 1300Hz इतका आहे. डिस्प्ले HDR 10+ सपोर्ट करत असून, त्यात sRGB आणि DCI:P3 दोन कलर मोड देण्यात आले आहेत.
 • फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आला आहे.
 • मोबाईलला गरम होण्यापासून वाचवण्यासाठी यात स्पेस कूलिंग हा पर्याय दिला देण्यात आला आहे.
 • वनप्लसच्या 9RT या स्मार्टफोनमध्ये आपल्याला तीन रिअर कॅमेरे देण्यात येते. त्यात 1.8 लेंससह 50 मेगापिक्सलचा सोनी IMX766 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. प्रायमरी कॅमेरा हा ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशनसह आहे आणि त्याद्वारे 4k व्हिडिओ रिकॉर्ड देखील केली जाऊ शकते. सोबतच सेल्फीसाठी सोनीचा 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
 • वनप्लस 9RT मध्ये 4500 mAh बॅटरी देण्यात आली आहे. सोबतच टाइप-C चार्जिंग केबल देखील मिळणार आहे. सोबतच मोबाईलला जलदरित्या चार्ज करण्यासाठी 65W चा फास्ट चार्जर देखील देण्यात आला आहे.
 • या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G, वायफाय आणि ब्लूटूथ v5.2 ची कनेक्टव्हिटीसोबत GPS आणि NFC सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनचे वजन केवळ 198.5 ग्राम इतकेच आहे.
बातम्या आणखी आहेत...