आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराह्युंदाईने 10 ऑगस्ट रोजी नवीन Hyundai Tucson लाँच करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. Hyundai Tucson चे हे फोर्थ जनरेशन मॉडेल असेल. आगामी SUV दोन प्रकारांमध्ये सादर केली जाईल - प्रीमियम आणि सिग्नेचर व्हेरियंट. कंपनीने आधीच 50 हजार रुपयांमध्ये बुकिंग सुरू केले होते.
Hyundai Tucson ला अवघ्या 15 दिवसांत 3,000 युनिट बुकिंग मिळाले आहे. विशेष म्हणजे Hyundai 10 ऑगस्ट रोजी त्याच्या किमती जाहीर करेल. Hyundai च्या फ्लॅगशिप SUV ची डिलिव्हरी सप्टेंबरपासूनच सुरु होण्याची अपेक्षा आहे.
ह्युंदाई टकसनचे डिझाइन
सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत नवीन मॉडेलमध्ये बदल दिसून येत आहेत. नवीन टकसनमध्ये मस्कुलर क्लॅडिंग, अँगुलर रुफलाइन, अद्ययावत फ्रंट आणि रिअर बंपर आहेत. तर एक्सटिरियर लेटेस्ट संसियस स्टाइलमध्ये आहे. ग्राहकांना इंटिग्रेटेड LED DRLs, कनेक्टेड LED टेल लॅम्प, शार्प बॉडी क्रीज, नव्याने डिझाइन केलेले 18-इंच अलॉय व्हील यात मिळतील.
स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स
2022 ह्युंदाई टकसनमध्ये 2.0L NAS पेट्रोल इंजिन आणि 2.0L टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन देण्यात आले आहे. त्यात AWD सिस्टमसह पेट्रोल इंजिनला 6 स्पीड AT आणि डिझेल इंजिनला 8 स्पीड AT मिळेल. ग्राहकांना 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ADAS, पॅनोरॅमिक सनरूफ आणि 360 डिग्री कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये मिळतील.
सप्टेंबरपासून डिलिव्हरी सुरु होईल
ह्युंदाई आगामी SUV कम्प्लिटली क्नॉक्ड डाउन (CKD) मार्गाने भारतात आणणार आहे. कंपनी ह्युंदाईची नवीन एसयूव्ही श्रीपेरुंबदुर, तामिळनाडू येथील प्लांटमध्ये असेंबल करेल. नवीन Hyundai Tucson मॉडेलची डिलिव्हरी सप्टेंबरच्या सुरुवातीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचे काही युनिट्स देशभरातील डीलरशिपपर्यंत पोहोचली आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.