आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अॅपलने वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स -२०२० मध्ये सर्व उपकरणांच्या ऑपरेटिंग सिस्टिमची नवीन आवृत्ती सादर केली. अत्याधुनिक कॉम्प्युटर्ससाठी मॅकओएस बिग सूरसोबतच आयपॅड ओएस १४, वॉच ओएस ७ आणि एअरपॅड्स प्रो सॉफ्टवेअरदेखील सादर केले. मॅकओएस बिग सूरमध्ये प्रायव्हसी बटण दिले आहे. हे बटण तुम्ही पाहत असलेल्या वेबसाइटद्वारे तुमच्या कोणत्या वैयक्तिक माहितीवर नजर ठेवली जाते, याची माहिती देईल. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी सोमवारी सांगितले की, भविष्यात अॅपल स्वतःची एआरएम संचालित सिलिकॉन वापरणार आहे.
वॉच ओएस ७ मधील वेबसाइटवरून डाऊनलोड, स्लीप ट्रॅकिंग करणे सोपे
वॉच ओएस ७ वापरणारे एकाच अॅपद्वारे एकाच वेळी अनेक कामे करू शकतील. वॉचफेस वेगवेगळ्या वेबसाइट्स किंवा मेसेजेसवरून डाऊनलोडदेखील केले जाऊ शकते. यात स्लीप ट्रॅकिंग फीचर मिळेल. कोविड-१९ ची साथ सुरू असल्याने अॅपलने हात धुण्यासंबंधित एक फीचर दिले आहे. हे फीचर युजरला हात धुण्याची आठवण करून देईल.
आयपॅड ओएस १४ वर पेन्सिलने लिहिलेले शब्दात बदलता येईल
आयपॅड ओएस १४ मध्ये अॅपल म्युझिकसाठी अनेक ऑप्शन असतील. संगीत सुरू असताना गाण्यांचे बोल स्क्रोल करून संकलित केले जाऊ शकते. अॅपल पेन्सिलच्या मदतीने अधिक चांगले काम करता येईल. आपण पेन्सिलने लिहिलेला मजकूर शब्दात बदलू शकता. साइडबारच्या मदतीने युजर सेक्शनमध्ये लगेच प्रवेश करता येऊ शकेल.
मॅकओएस बिग सूर डेस्कटाॅपवरील सेव्ह पासवर्डची सुरक्षा करणार
मॅकओएस बिग सूरमध्ये एक प्रायव्हसी बटण आहे. ते डेस्कटॉपवर सेव्ह केलेल्या पासवर्डची नोंद ठेवेल. ही प्रणाली पासवर्डचे परीक्षण करेल आणि गैरवर्तन करणाऱ्यांपासून तुम्हाला सावध करेल. जर आपण चिनी वेबसाइटवर चीनच्या मंदारिन भाषेत कोणतीही बातमी पाहत असाल तर ती लगेच तिचे भाषांतर करेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.