आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tech auto
  • Production of maruti hyundai toyota honda stalled supply chain needed for production

ऑटो :मारुती, ह्युंदाई, टाेयाेटा, हाेंडाचे उत्पादन रखडले, उत्पादनासाठी पुरवठा साखळी गरजेची

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • वाहननिर्मिती पुन्हा सुरू करण्यासाठी सुट्या भागांचा साठा असणे गरजेचे

मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाेयाेटा आणि हाेंडासारख्या देशातील प्रमुख कार कंपन्यांना अजूनही आपल्या कारखान्यांमध्ये माेटारींचे पुन्हा उत्पादन सुरू करण्यास अडचणी येत आहेत. काेराेना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात लाॅकडाऊन सुरू आहे. त्यामुळे कंपन्यांना वाहनांचे सुटे भाग मिळणे जिकिरीचे झाले आहे. वाहननिर्मिती पुन्हा सुरू करण्यासाठी सुट्या भागांचा साठा असणे गरजेचे आहे. काेराेना संक्रमणामुळे सर्व वाहन कंपन्यांचे प्रकल्प जवळपास एक महिन्यापासून बंद आहेत. त्याचबराेबर या कंपन्यांना वाहनांच्या सुट्या भागाचा पुरवठा करणाऱ्या आॅटाे अॅन्सिलरी कंपन्यांचे प्रकल्पदेखील बंद असून वाहनांच्या सुट्या भागांची दुकानेदेखील बंद आहेत.


उत्पादनासाठी पुरवठा साखळी गरजेची

टाेयाेटा किर्लाेस्कर माेटर्सचे प्रवक्ते म्हणाले, वाहन क्षेत्रातील उत्पादन सुरू करण्यासाठी पुरवठा साखळी सुरू करणेही गरजेचे आहे. याचा अर्थ केवळ पुरवठा नाही तर वितरकांनीदेखील काम सुरू केले पाहिजे. वाहन वितरक व पुरवठादारांचे काम बंद आहे. ह्युंदाई चे प्रवक्ते म्हणाले, प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत आहोत.

0