आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया गेमवर भारतात बंदी:सरकारने PUBG नंतर अ‍ॅप स्टोअरमधून केली BGMI ची हकालपट्टी, आता फक्त प्री-इंस्टॉल डिव्हाइसवर उपलब्ध

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खेळातून गुन्हेगारीला चालना मिळाली

PUBG मोबाइलची रिब्रांडेड आवृत्ती BGMI (Battlegrounds Mobile India) क्रफ्टॉनचा हा गेम Google Play Store आणि Apple App Store वरून काढून टाकण्यात आला आहे. अहवालानुसार, सरकारी आदेशानंतर हा गेम दोन्ही प्लॅटफॉर्मने काढून टाकला आहे.

यामागचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी 'PUBG सारख्या ऑनलाइन गेम'मुळे 16 वर्षांच्या मुलाने आपल्या आईची हत्या केली होती. हे प्रकरण संसदेत पोहोचले होते, त्यानंतर सरकारने गृहमंत्रालय याची चौकशी करत असल्याचे सांगितले होते. सरकारने म्हटल्यानुसार काही बंदी घातलेले अॅप पुन्हा एकदा त्यांचे नाव बदलून भारतीय बाजारपेठेत आले आहेत.

खेळातून गुन्हेगारीला चालना मिळाली
गृह मंत्रालय त्याची चौकशी करत आहे. गेल्या आठवड्यात राज्यसभा खासदार व्ही विजयसाई रेड्डी यांनी यावर सवाल उपस्थित केला होता. त्यांनी विचारले होते की, आयटी मंत्रालय PUBG सारख्या गेमवर काही कारवाई करत आहे का, जेव्हा मुलांना असे गेम खेळण्यापासून रोखले जाते तेव्हा मुले असे गुन्हे करण्यास सुरुवात करतात, असे ते म्हणाले होते.

सप्टेंबर 2020 मध्ये PUBG बंदीनंतर 2021 मध्ये BGMI ला भारतात लाँच करण्यात आले होते. एका वर्षात डाउनलोडच्या बाबतीत त्याने 10 लाख डाउनलोडचा विक्रम केला होता.

क्रफ्टॉनचे काय आहे म्हणणे?
क्रफ्टॉनच्या प्रवक्ते Google Play Store आणि Apple App Store वरून BGMI ला वगळण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा देतात. Googleच्या म्हणण्यानुसार, त्यांनी गेम वगळण्यापूर्वी क्रफ्टॉनला याची माहिती दिली होती.

भारतात 140 मिलियन डॉलर्स गुंतवण्याची योजना होती
BGMI देखील त्याच क्रफ्टॉन इंक कंपनीच्या अंतर्गत येते ज्याअंतर्गत PUBG मोबाइल येतो. विशेष म्हणजे, अलीकडेच दक्षिण कोरियाची कंपनी क्रफ्टॉनने सांगितले की, कंपनीने भारतात आतापर्यंत 100 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. आगामी काळात कंपनीची भारतातील गुंतवणूक 140 मिलियन डॉलर्सपर्यंत असेल.

भारतात या कंपनीला केवळ गेमिंग क्षेत्रातच नव्हे तर इतर क्षेत्रातही हात आजमावायचा आहे. बीजीएमआयची बहुतेक वैशिष्ट्ये PUBG मोबाईल सारखीच आहेत. काही नकाशे देखील PUBG मोबाईल सारखीच आहेत. या गेमने भारतात PUBG मोबाईलची पोकळी भरून काढली आहे. खरे तर हे दोन्ही गेम दक्षिण कोरियन कंपनी क्रफ्टॉन इंकचेच आहेत.

बातम्या आणखी आहेत...