आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • Recipes Powered By Artificial Intelligence Only Look Good, Some Dishes Taste Like Grass

किचनमध्ये एआय:आर्टिफिशियल इंटेलिजन्सने दिलेली रेसिपी केवळ दिसायला सुंदर, काही व्यंजनाची चव गवतासारखी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आर्टिफिशियल इंटेलिजन्सने जवळपास सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. डेटा अॅनालिसिस करणाऱ्या एआय जीपीटी-३ ने ब्लाॅग क्रिएशन, आर्ट क्रिएशन एवढेच नव्हे तर काॅम्प्युटर काेड तयार करण्याचे काम अतिशय कुशलतेने केले. आता संशाेधक आणि शेफने जीपीटी-३ ला खाद्य पदार्थ तयार करण्याचे काम दिले. याद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय तंत्रज्ञान) स्वयंपाक घरात किती उपयुक्त ठरेल, याचे परीक्षण करण्यात आले. फूड रिपाेर्टर प्रिया कृष्णा यांना एआयने दिलेली रेसिपी खूप सुंदर असेल असे वाटले. एवढेच नाही तर ती इतरांना एेकवली तरी त्यात काही विचित्र वाटले नाही. परंतु एआयने सांगितलेली रेसिपी प्रत्यक्षात केल्यानंतर ती मुळीच खाण्यालायक नव्हती. प्रिया कृष्णा यांनी जीपीटी-३ चा वापर केला. त्यांनी आधी सिस्टिमला खासगी माहिती दिली. त्यात काैटुंबिक पार्श्वभूमी, स्वाद, पसंती इत्यादी बद्दलची माहिती दिली. त्यानंतर सिस्टिमने काही रेसिपींचे पर्याय सुचवले. रेसिपी पाहून पदार्थ स्वादिष्ट हाेईल, असे वाटले हाेते. पण आशेवर पाणी फेरले गेले. केकची रेसिपी केवळ दिसायला सुंदर हाेती. ते बनवल्यानंतर खाल्ले तेव्हा त्याचा स्वाद चना मसाला आणि फ्रूट केकसारखा लागला. चाट गवतासारखे लागले. अगदी बेचव हाेते. वास्तविक एआय जीपीटीने सांगितलेल्या सर्व रेसिपी उत्कृष्ट असल्याचा दावा केला हाेता. फूड टेस्ट डेटावर आधारित नसल्याचे स्पष्ट हाेते.

न्यूरल नेटवर्कद्वारे कंटेंट बनवताे जीपीटी-३ आेपन एआयने जीपीटी-३ नावाचे एक न्यूरल नेटवर्क तयार केले आहे. ते भरमसाठ डेटाचे विश्लेषण करून आपल्या कंटेटची निर्मिती करते. हे नेटवर्क शब्द, अंक, चिन्हांच्या पॅटर्नला समजू शकते. ऑप्टिक्स रिसर्च सायंटिस्ट या एआयद्वारे रेसिपी बनवण्याबाबत संशाेधन करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...