आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातंत्रज्ञानाच्या वाढत्या पकडीमुळे नोकऱ्या संपण्याचे दावे वर्षानुवर्षे केले जात आहेत. दहा वर्षांपूर्वी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कार्ल फ्रे आणि मायकेल ऑस्बोर्न यांनी एका शोधनिबंधात दावा केला होता की, येत्या दहा ते वीस वर्षांत ४७% अमेरिकन कामगारांच्या नोकऱ्या स्वयंचलित होतील. टेस्लाचे मालक एलन मस्क म्हणतात की, लवकरच रोबोट्सची संख्या मानवांपेक्षा जास्त होईल. पण, तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या संपण्याची भीती खरी ठरलेली नाही. प्रत्येक बेरोजगार अमेरिकनासाठी २ नोकऱ्या उपलब्ध आहेत. तरीही रोबोट्स वापरणाऱ्या उद्योगांची संख्या वाढत आहे.
अमेरिकन उद्योग समूह अॅडव्हान्सिंग ऑटोमेशन असोसिएशनचे अध्यक्ष जेफ बर्नस्टीन म्हणतात की, अलीकडे काही उद्योगांमध्ये रोबोट्सचा वापर वाढला आहे. एबीबी या स्विस कंपनीचा रोबोटिक्स व्यवसाय चालवणारे सामी अथिया म्हणतात, संगणकामुळे यंत्रे अधिक कार्यक्षम आणि सक्षम झाली आहेत. हलक्या वजनाचे रोबोट मानवी कामगारांसोबत काम करतात. स्वयंचलित वाहने कारखाने आणि गोदामांमध्ये माल इकडून तिकडे नेतात. यासोबतच रोबोटच्या किमतीही घसरल्या आहेत. आर्क इन्व्हेस्ट अॅसेट मॅनेजमेंटच्या मते, औद्योगिक रोबोट्सचे मूल्य २००५ मध्ये ५६ लाख रुपयांवरून २०१७ मध्ये २२ लाख रुपयांवर आले. डिसेंबरमध्ये एबीबीने शांघायमध्ये एक मोठा कारखाना उघडला. इथे यंत्रमानव रोबोट बनवतात. इंटरनॅशनल रोबोटिक्स फेडरेशनचे सरचिटणीस बिलर म्हणतात की, रोबोट्स बसवण्याचा खर्चही कमी झाला आहे.
जगात रोबोट्सची संख्या २०११ मधील १० लाखांवरून २०२१ मध्ये ३५ लाख झाली. फानुक या रोबोट बनवणाऱ्या मोठ्या जपानी कंपनीच्या विक्रीत गेल्या तिमाहीत १७% वाढ झाली. केयेन या कंपनीने विक्रीत २४% झेप घेतली. तथापि, २०२१ च्या तुलनेत विक्री थोडी कमी झाली. त्या वेळी कोविड-१९ मुळे कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे अनेक कंपन्या रोबोट्स खरेदी करत होत्या. रोबोट कंपन्यांचे शेअर २० टक्क्यांनी वधारले आहेत. कर्मचाऱ्यांच्या तुलनेत संख्या खूप कमी ः रोबोट्सची संख्या वाढली असली तरी त्यांच्या वापराचे प्रमाण कमी आहे. दक्षिण कोरियन कंपन्यांमध्ये दर १० कर्मचाऱ्यांमध्ये एक औद्योगिक रोबोट आहे. अमेरिका, चीन, युरोप आणि जपानमध्ये २५ ते ४० कर्मचाऱ्यांमागे एक रोबोट आहे. २०२० मध्ये जगातील जागतिक भांडवली खर्चात औद्योगिक रोबोट्सचा वाटा १% पेक्षा कमी होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.