आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • Samsung Galaxy A32 । The New A32 Will Get 128GB Of Storage Along With 8GB Of RAM And Will Cost Rs 23,499 To Get A Phone

सॅमसंग गॅलक्सी A32 चा नवा व्हॅरिअंट लॉन्च:A32 या नव्या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅमसह 128GB स्टोरेज मिळणार, फोन घेण्यासाठी मोजावे लागणार 23,499 रुपये

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅमसंगने आपल्या नव्या A32 स्मार्टफोनला अखेर भारतात लॉन्च केले आहे. हा मोबाईल पुर्वीच्या A32 पेक्षा काहीसा वेगळा पाहायला मिळणार आहे. त्यात आता 8GB रॅमसह 128GB स्टोरेज दिले जाणार आहे. या पुर्वीचा गॅलक्सी A32 हा मोबाईल मार्च 2021 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. तर आधी जागतिक बाजारपेठेत रशिया आणि ब्रिटेनमध्ये या मोबाईल 4G आणि 5G कनेक्टिविटीसोबत लॉन्च करण्यात आले होते. मात्र सॅमसंग इंडियाने 5G कनेक्टिविटी सध्या तरी दिलेली नाही.

23,499 रुपये किंमत
सॅमसंग गॅलक्सी A32 8/128 या नव्या स्मार्टफोनची किंमत कंपनीने 23,499 रुपये इतकी ठेवली आहे. याची खरेदी ऑनलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. यापुर्वीच्या सॅमसंग गॅलक्सी A32 ला 21,999 रुपयांमध्ये मार्चमध्ये लॉन्च करण्यात आले होते. त्यामध्ये कंपनीने 6GB रॅमसह 128GB स्टोरेज दिला होता. सोबतच त्यामध्ये ऑसम ब्लॅक, ऑसम व्हाइट, ऑसम ब्लू आणि ऑसम व्हायलेट असे कलर देण्यात आले होते.

सॅमसंग गॅलक्सी A32 चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग A32 या मोबाईलमध्ये 4G कनेक्टिविटीसह 6.4 इंच फुल HD+ सुपर एमोलेड इनफिनिटी यू नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G80 चा प्रोसेसर, 8GB रॅम, 128GB स्टोरेज देण्यात आला आहे. सोबतच त्या मेमोरीला 1TB पर्यंत वाढवले जाऊ शकते.

चार रिअर कॅमेरे मिळणार
सॅमसंगच्या या A32 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर क्वॉड कॅमेरा मिळणार आहे. ज्याची मेन लेंस 64 मेगापिक्सलटची असणार आहे. तर F/1.8 चा अपर्चर देण्यात आला आहे. तर दुसरा कॅमेरा अल्ट्रा वाइड अॅगंलचे असणार असून तो 8 मेगापिक्सलचे आहे. माइक्रो सेंसरसाठी यात 5 मेगापिक्सल तर डेफ्थ सेंसर 2 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा कॅमेरा लावण्यात आला आहे.

5000mAh बॅटरी

A32 या मोबाईलमध्ये कंपनीने 5000mAh ची बॅटरी दिली आहे. सोबतच त्याला जलदगतीने चार्ज करण्यासाठी 15W चे फास्ट चार्जर देखील देण्यात आला आहे. चार्जिंगसाठी USB टाईप-C देण्यात आली आहे. फोनचे वजन 184 ग्राँम इतके आहे. सोबतच डिस्प्लेमध्ये फिंगरप्रींट सेंसर देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...