आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • Signal's Moxie Marlinspike Quits | Marathi News | WhatsApp Co Founder Brian Acton To Take Over As Interim CEO

मोक्सी मार्लिंसपाइकांचा राजीनामा:सिग्नलच्या संस्थापकांचा CEO पदावरुन राजीनामा; म्हणाले, स्वतःला बदलण्याची हीच चांगली वेळ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सिग्नल या सोशल मीडिया अ‍ॅपचे CEO मोक्सी मार्लिंसपाइक यांनी आपल्या पदाचा आज राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता व्हॉट्सअ‍ॅप को-फाउंडर ब्रायन एक्टन यांना देण्यात आली असून, ब्रायन आता सिग्नलचे अंतरिम CEO असणार आहे. मोक्सीने स्वत: आपण राजीनामा दिल्याची माहिती ट्विटवर शेअर केली आहे.

मोक्सी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, नवीन वर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे मी असा निर्णय घेतला आहे की, मी सिग्नलच्या CEO पदावरुन राजीनामा देणार, कारण स्वत:त बदल करण्यासाठी ही एक चांगली संधी असल्याचे मोक्सी म्हणाले. पुढे ट्विटमध्ये मोक्सी लिहतात की, मी सध्या सिग्नलच्या CEO पदासाठी एका चांगल्या माणसाचा शोध घेत आहे. असे ट्विट मोक्सी यांनी केले आहे.

ब्रायन एक्टनने 2009 साली व्हॉट्सअ‍ॅपमध्ये काम सुरू केले

मोक्सी यांनी सिग्नलच्या CEO पदाचा राजीनामा दिल्यानंतर, आता ब्रायन एक्टन हे कंपनीची धुरा सांभळणार आहे. एक्टन यांनी 2009 साली व्हॉट्सअ‍ॅपमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. 2014 साली मेटा प्लॅटफॉर्म असणाऱ्या फेसबुकने व्हॉट्सअ‍ॅपला खरेदी केले होते. 2017 ब्रायन एक्टन यांनी व्हॉट्सअ‍ॅपला आपला राजीनामा दिला होता.

सिग्नलमध्ये 370 कोटींचा फंडिंग
2008 साली मोक्सी आणि एक्टन या दोघांनी नॉन प्राफिटवर सिग्नल अ‍ॅपची सुरुवात केली. त्यादरम्यान एक्टनने सिग्नलसाठी 50 मिलियन डॉलर म्हणजे 370 कोटी रुपयांचा निधी सिग्नलसाठी दिला. सिग्नल देखील व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणे मल्टीमीडिया मॅसेजिंग अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप्लिकेशन विंडोज, iOS, मॅक आणि अ‍ॅड्राईड या प्रणालीवर चालते.