आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉचिंग:स्कोडा कोडियाक 4X4 भारतात लॉंच; डोअर एज प्रोटेक्टर सारख्या सेफ्टी फीचर्ससह सुसज्ज कार, जाणून घ्या- किंमत व फीचर्स

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चेक रिपब्लिकन कार निर्माता कंपनी स्कोडा ऑटो इंडियाने भारतात 7 सीटर कोडियाक लॉंच केला आहे. ही कार डोअर एज प्रोटेक्टर सारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. जी कार तिच्या दरवाज्याचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते.

कंपनीने पहिल्यांदा ही फुल साइज एसयूव्ही 2017 मध्ये सादर केली होती. 2023 कोडियाक लाँच होताच. 24 तासांत त्यातील 759 युनिट्स विकल्या गेल्या आहेत. मागणी लक्षात घेऊन कंपनीने आता वाहनांच्या वितरणाची संख्या वाढवली आहे. स्कोडा आता ग्राहकांना दर तिमाहीत 750 कोडियाक कार देते.

3 व्हेरिएंटमध्ये कार उपलब्ध
कारच्या एअरो डायनॅमिक्स सुधारण्यासाठी मागील स्पॉयलरला अतिरिक्त फिनलेटसह वाढविण्यात आले आहे. याशिवाय कारच्या दुसऱ्या रांगेत प्रवाशांसाठी मोठ्या लाऊंज स्टेप्स आणि बाहेरील हेडरेस्ट्सही देण्यात आले आहेत.

ही कार स्टाइल, स्पोर्टलाइन आणि L&K या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. कोडियाकची किंमत Rs.37.99 लाख पासून सुरू होते. जी टॉप व्हेरियंटसाठी 41.39 लाख रुपयापर्यंत जाऊ शकते. ही किंमत एक्स-शोरूम दिल्लीतील आहे.

स्कोडा कोडियाक : पॉवरट्रेन

  • स्कोडा कोडियाकला BS-6 फेज-2 नियमांनुसार अपडेटेड 2.0 TSI EVO टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 187 bhp पॉवर आणि 320 nm टॉर्क जनरेट करते.
  • इंजिनला 7 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सने ट्यून केले आहे. हे इंजिन मागील मॉडेलपेक्षा 4.2% अधिक इंधन कार्यक्षम आहे.
  • ही कार E-20 पेट्रोलवरही धावू शकते. कार 7.8 सेकंदात 100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते. कारमध्ये इको, कम्फर्ट, नॉर्मल, स्पोर्ट, पर्सनल आणि स्नो असे 6 ड्रायव्हिंग मोड आहेत. कार 4x4 सिस्टमला सपोर्ट करते.