आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
टेस्लाने सोमवारी सांगितले फ्लॅगशिप इलेक्ट्रिक सेडान मॉडल S 'लॉन्ग रेज प्लस' सिंगल चार्जमध्ये 402 मी (जवळपास 644 किमी.) ची रेंज प्रदान करणारी पहिली इलेक्ट्रिक कार बनली आहे. ही रेटिंग पर्यावरण संरक्षण एजेंसी द्वारे देण्यात आली आहे. कंपनीने यामध्ये व्हिल्ससोबतच अनेक बदल केले आहेत. टेस्लाने वर्षाच्या सुरूवातीस मॉडेल S ची नवीन "लाँग रेंज प्लस" आवृत्ती सादर केली होती. कंपनीने म्हटले आहे की ती 2019 मॉडेल S 100D च्या तुलनेत यामध्ये 20 टक्के जास्त रेंज मिळते.
मॉडेल S मध्ये बदल करून बनवले नवीन व्हर्जन
मॉडेल S मध्ये बदल करुन S 'लाँग रेंज प्लस' मागच्या वर्षी बनवली होती. मॉडेल एसमध्ये अनेक किरकोळ बदल करण्यात आले होते. टेस्लाने ईपीएला नवीन रेटिंग देण्यासाठी याचे नाव मॉडल एस 'लाँग रेंज प्लस' व्हर्जन असे ठेवले होते. त्याच वेळी टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी असा दावा केला की टेस्ला 400 मील इलेक्ट्रिक कारसारखीच आहे.
पहिल्यांदा टेस्टिंमध्ये ईपीएने चूक केली होती - मस्क
टेस्लाच्या Q1 2020 च्या निकालादरम्यान, मस्कने दावा केला की, त्यांनी यापूर्वीच हे मिळवले आहे. कारण नवीन मॉडल S लॉन्ग रेंज प्लसची टेस्टिंग करताना ईपीएने एक चूक केली होती. सीईओने दावा केला की, पर्यावरण संरक्षण एजेंसीने आपल्या सायकल टेस्टदरम्यान वाहनच्या आत चावीसोबत एक दरवाजा उघडा ठेवला होता. याचा परिणाम म्हणून इलेक्ट्रिक कार 'स्लीप मोड' मध्ये जाऊ शकली नाही. याच कारणामुळे बॅटरी संपली होती. मात्र ईपीएने हे वृत्त फेटाळून लावले.
आता काही महिन्यांनंतर टेस्लाने घोषणा केली आहे की, त्यांनी 402 मील एवढी रेंज मिळवली आहे : 'ही महत्त्वपूर्ण कामगिरी टेस्लाची कार्यक्षमता आणि उर्जा अर्थव्यवस्थेविषयीचे व्यायाम प्रतिबिंबित करते. टेस्ला इंजीनियरिंग, डिझाइन आणि प्रोडक्शन टीमद्वारे कोर हार्डवेअर आणि सिस्टम आर्किटेक्चर तयार करण्यात आला आहे. यावर्षीच्या सुरुवातीला हे बदल झाले. जेव्हा पहिल्यांदा कॅलिफोर्नियाच्या फ्रेमोंटमध्ये आपल्या कारखान्यामध्ये मॉडल एस लॉन्ग रेंज प्लसची निर्मिती सुरू झाली. सर्व मॉडल S लॉन्ग रेंज प्लस वाहनांना नवीन 402-मीलची रेटिंग प्राप्त होईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.