आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
फेकन्यूजला अाळा घालण्यासाठी व्हाॅट॰सअॅप सध्या नवीन फीचर्सवर काम करत अाहे. या माध्यमातून युजर्सना त्यांना अालेल्या मेसेजची सत्यता पडताळून पाहता येऊ शकेल. व्हाॅट्सअॅपची मालकी असलेल्या फेसबुक या कंपनीने अशा प्रकारचे फीचर्स तयार करण्यात येत असल्याबद्दल चुकून पण स्वत:च दुजाेरा दिला. व्हाॅट्सअॅपच्या एफक्यू पेजवर याबाबतची लिंक दाखवण्यात अाली हाेती. त्यानुसार जेव्हा तुम्हाला एखादा फाॅरवर्ड केलेला मेसेज मिळेल त्या वेळी मेसेजच्या जवळ असलेल्या दाेन बाणांचे (अॅराे) चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक करून या संदेशाची सत्यता पडताळून पाहता येऊ शकेल.
त्यानुसार, जेव्हा आपण संदेश बऱ्याच वेळा फॉरवर्ड कराल, तेव्हा आपल्या मजकुराच्या पुढे दुहेरी बाण चिन्ह असलेले शोधचिन्ह दिसेल. संदेशाचे सत्य जाणून घेण्यासाठी आपल्याला सर्चवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर हा मेसेज थेट गुगलवर अपलाेड हाेईल. त्यानंतर तुम्ही त्या पेजवर रिडायरेक्ट व्हाल. तुम्हाला अालेला मेसेज हा पडताळणी करून अालेली खरी बातमी अाहे की नाही हे येथे सिद्ध हाेईल. सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे. सर्वात अाधी ते अँड्राॅइड युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात येईल. काेराेनाशी निगडित अफवांना चाप लावण्यासाठी व्हाॅट्सअॅपने फाॅरवर्डेड मेसेजची मर्यादा ५ युजर्सवरून कमी करून १ केली हाेती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.