आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील विविध भागांत लॉकडाऊनचे निर्बंध हळूहळू हटल्याने जूनदरम्यान कारच्या विक्रीत सुधारणा येत आहे. मात्र, सध्या कारची विक्री जानेवारी २०२१ च्या पातळीपर्यंत पोहोचली नाही. जानेवारीच्या तुलनेत जूनच्या महिन्यात ८-२७% घट पाहायला मिळाली. वाहन तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जसजसे देशाच्या विविध भागांत लॉकडाऊनचे निर्बंध हटवले आणि शिथिलता दिली, कारची विक्री कोरोनापूर्वच्या सामान्य पातळीवर पोहोचेल. विशेष म्हणजे, जानेवारी २०२१ मध्ये कार विक्रीत वार्षिक आधारावर कोरोना महामारी येण्याआधी जानेवारी २०२० च्या तुलनेत ४.३ ते २५% पर्यंत वाढ पाहायला मिळाली होती. गेल्या जूनमध्ये देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीने आपल्या डीलर्सना १,४७,३६८ कार विकल्या. जानेवारी २०२१ च्या तुलनेत ही केवळ ८% घट आहे. कंपनीने जानेवारीत १,६०,७५२ कार विकल्या होत्या. याच पद्धतीने देशाची दुसरी मोठी कार निर्माती ह्युंदाई मोटर इंडियाने जूनमध्ये ५४,४७४ कार विकल्या आहेत. ही जानेवारीत विकलेल्या ६०,१०५ कारच्या तुलनेत केवळ ९% कमी आहे. टाटा मोटर्सने जूनमध्ये ४३,७०४ कार विकल्या. या वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात विकलेल्या ५९,९५९ कारच्या तुलनेत २७% कमी आहे. महिंद्रा अँड महिंद्राने जूनमध्ये ३२,९६४ कार विकल्या आहेत. ही जाने. २०२१ मध्ये विकलेल्या ३९,१४९ कारच्या तुलनेत १६% कमी आहे.
चालू वित्त वर्षात दुचाकीची विक्री १२-१४% वाढण्याची अपेक्षा : इक्रा
पतमानांकन संस्था इक्रा रेटिंगने चालू वित्त वर्ष २०२१-२२ दरम्यान दुचाकी वाहनांच्या विक्रीत १२-१४% वाढीचा अंदाज कायम ठेवला आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर समग्र विक्री आणि गुंतवणूक ठीक होण्यास काही काळ लागू शकतो. मात्र, ग्रामीण अर्थव्यवस्थेतून काहीशी मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
जानेवारी २०२१ च्या तुलनेत मारुतीच्या विक्रीत ८ टक्के घट
जानेवारी २०२१ शी तुलना का? जानेवारी २०२१ मध्ये कारची विक्री कोरोनापूर्व म्हणजे, जानेवारी २०२० पेक्षाही चांगली राहिली. वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात मारुतीची विक्री ४.३%, ह्युंदाईची १६% व टाटा मोटर्सची २५% वाढली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.