आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
17 जूनला भारतात सॅमसंग गॅलेक्सी A21s स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. सॅमसंग इंडियाने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. यापूर्वी यूनायटेड किंगडममध्ये सॅमसंगची बजेट A-सीरीजच्या नव्या एडिशनला लॉन्च करण्यात आले आहे. फोनमध्ये चार रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त यामध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 5,000 एमएएच बॅटरी असणार आहे. तसेच या फोनमध्ये तीन कलर उपलब्ध असतील. तर सिक्योरिटीसाठी फेस रिकग्निशन आणि फिंगरप्रिंट सेंसरही असेल. बॅटरी 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.
सॅमसंग गॅलेक्सी A21s: भारतात किंमत
सॅमसंग इंडियाने सोमवारी ट्विट करुन लॉन्चिंगची माहिती दिली. मात्र कंपनीने या ट्विटमधून गॅलेक्सी A21s स्मार्टफोनच्या भारतीय किंमतीचा खुलासा केलेला नाही. यूनायडेट किंगडममध्ये हा स्मार्टफोन GBP 179 म्हणजेच जवळपास 17,000 रुपए किंमतीमध्ये लॉन्च करण्यात आला होता. या व्यतिरिक्त स्मार्टफोनची विक्री लॉन्चिंगच्या तात्काळ नंतर सुरू होणार की, खरेदीसाठी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार याविषयी स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. या गोष्टीचा खुलासा 17 जूनलाच होऊ शकेल. हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि व्हाइट कलरमध्ये उपलब्ध असणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी A21s: बेसिक स्पेसिफिकेशन
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.