आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२०२२ मध्ये देशात इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी सुमारे १० लाख वाहने विकली गेली. आता प्रमुख वाहन कंपन्या यात उतरल्या असल्याने यंदा या संशोधनातून होणारे हे संक्रमण आवाजाचे प्रदूषण, कार्बन उत्सर्जन अर्थात पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने क्रांतिकारी ठरेल. वित्तपुरवठा करणाऱ्या बँका, संस्थाही यात उतरतील. राष्ट्रीय महामार्गांवर १३७ ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी केंद्राने निधीची तरतूद केली आहे. चालू वर्षात बरेच काम होईल. प्रदूषणमुक्त वाहनांमुळे मानवी जीवनच बदलून जाईल.
नव्या विश्वाची ओळख : एआय युगाला गती तंत्रज्ञानाने मानवी जीवनात एक मोठे, आकर्षक आभासी विश्व निर्माण केले आहे. या वर्षात अशा विश्वाचे नवे रूप स्पष्टपणे जगासमोर येईल. याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जोड मिळाल्याने आभासी जगात तुम्ही जे काही पउहाल ते खरेदी करण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला मिळेल. २०१७ मध्ये अमेरिकेत एका कंपनीने यावर काम सुरू केले होते. आता सोशल मीडियातील मोठा ब्रँड या क्षेत्रात उतरला असल्याने हे संक्रमण नव्या वर्षात नवा आनंद लुटण्याची संधी देईल. हे संक्रमण नव्या क्रांतिकारी विश्वाची ओळख करून देईल.
वायरलेस टीव्ही : आधुनिक फीचर्सनी सज्ज लास वेगासमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सीईएस-२०२३मध्ये (कंझ्युमर इलेक्ट्रानिक शो) अनेक नवे शोध सादर करण्यात आले. यात वायरलेस टीव्ही या वर्षात क्रांतिकारी ठरेल. आधुनिक फीचर्सनी सज्ज हा टीव्ही भिंतीवर नुसता चिकटवला की बस्स! बॅटरीवर चालणारा हा टीव्ही या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असेल. याच्या मायक्रो बॅटरीज पण सहज बदलता येतील. बॅटरीचा एक सेट चार्जिंगसाठी दिलेला असेल आणि दुसरा टीव्हीला जोडलेला असेल.
रंग बदलणाऱ्या स्मार्ट कार : ३२ रंगांची सुविधा गेल्या वर्षापर्यंत प्रतिष्ठित कार कंपन्या आपल्या इच्छेनुसार कारचा रंग बदलता येऊ शकेल असे तंत्रज्ञान विकसित करण्यात गुंतल्या होत्या. यात ब्लॅक अँड व्हाइट तसेच ग्रे रंगापर्यंत संशोधकांना यश आले होते. या वर्षी अशा कारमध्ये एक-दोन नव्हे ३२ रंगांत बदलता येतील. मिश्र रंगांचीही सोय आहे. चालू वर्षात अशा शानदार कार रस्त्यांवर धावताना दिसतील. अर्थातच या कार एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून स्वनियंत्रित पद्धतीने चालतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.