आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटोमोबाइल:अमेरिका- नवीन कारची विक्री सात लाखांनी घटली, दशकातील सर्वात जास्त

जेफ्री क्लूगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • किंमत वाढ, महागाई आणि व्याजदरामुळे कमी झाली विक्री

अमेरिकेत २८ कोटी ४० लाख वापरलेल्या कार आहेत आणि त्यांची संख्या दररोज वाढत आहे. वापरलेल्या कारचे सरासरी वय १२.५ वर्षे आहे. यापूर्वी कधीही जुन्या गाड्यांची संख्या इतकी नव्हती. तज्ज्ञांच्या मते ही स्थिती पर्यावरणासाठी चांगली नाही. रिसर्च ग्रुप एस अँड पी ग्लोबल मोबिलिटीच्या अलीकडील अभ्यासात यूएस मधील नवीन आणि वापरलेल्या कारबाबत काही ट्रेंड समोर आले आहेत. सलग सहाव्या वर्षी रस्त्यावर वापरलेल्या गाड्यांची संख्या वाढली आहे. साथीच्या आजारामुळे गेल्या तीन वर्षांत सर्वाधिक वाढ झाली आहे. संगणक चिप्सच्या कमतरतेमुळे पुरवठा प्रभावित झाला आणि वाहनांच्या किमती वाढल्या. पेट्रोल कारची सरासरी किंमत ३९ लाख रुपये आहे. व्याजदर वाढल्याने नवीन कारसाठी कर्जाचा दर ६% वाढला आहे. त्यामुळे नवीन गाड्यांची खरेदी प्रभावित झाली आहे.

इलेक्ट्रिक गाड्या चलनात यायला वेळ लागेल सध्याच्या परिस्थितीत २८ कोटींहून अधिक गॅसवर चालणाऱ्या मोटारींची जागा स्वच्छ इलेक्ट्रिक कारने घेतल्याचे चित्र फारसे उज्ज्वल दिसत नाही. तज्ज्ञांना वाटते की इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या किमतीमुळे लोक त्यांच्या जुन्या गाड्या लवकर सोडणार नाहीत. विकले जाणारे प्रत्येक वाहन इलेक्ट्रिक असले तरीही, गॅसवर चालणाऱ्या निम्म्या गाड्या बदलायला अजून दहा वर्षे लागतील. केम्पीयूचा विश्वास आहे की विकले जाणारे प्रत्येक वाहन इलेक्ट्रिक नसल्यामुळे, इलेक्ट्रिक वाहने कम्बशन इंजिन (पेट्रोल, गॅस) कारला जास्त काळ मागे सोडू शकणार नाहीत. हे २०४० किंवा २०५० पर्यंत होण्याची शक्यता आहे.

वाहनांच्या आयुष्याचा प्रश्न पूर्ण विरुद्ध आहे. यूएसमध्ये सध्या वीस लाखांहून अधिक ईव्ही रस्त्यावर आहेत. हे एकूण कारच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. एसअँडपीच्या मते, सध्या इव्हीचे सरासरी वय ३.६ वर्षे आहे. इलेक्ट्रिक कारच्या श्रीमंत मालकांकडे खर्च करण्यासाठी पैसे आहेत. म्हणूनच ते नवीन कार घेतात. तर ज्यांच्याकडे पैसे कमी आहेत ते चढे भाव आणि व्याजदरामुळे गप्प बसले आहेत.

२०२१मध्ये एक कोटी ४६ लाख नवीन कार विकल्या गेल्या. त्यांची विक्री २०२२ मध्ये सात लाखांनी घटून एक कोटी ३९ लाखांवर आली. गेल्या दहा वर्षांतील नवीन कार विक्रीतील ही सर्वात मोठी घसरण आहे. एस अँड पी ग्लोबल मोबिलिटीचे सहयोगी संचालक टॉड केम्पीयू म्हणतात की, अंडी, किराणा सामानापासून ते पेट्रोलपर्यंत सर्व गोष्टींच्या किमती वाढल्या आहेत. घर चालवण्याचा खर्च वाढल्याने लोकांकडे पैसे कमी पडत आहेत. त्यामुळे अनेकांना जुनी कार विकून नवीन कार घ्यायची नसते. नवीन कार विक्रीत घट झाल्याचा परिणाम वातावरणावर पडणार आहे. केम्पीयू म्हणतात, १२.५ वर्षांपूर्वी बनवलेली कार आधुनिक तंत्रज्ञान, कमी पेट्रोल, गॅस वापरणाऱ्या नवीन कारपेक्षा जास्त प्रदूषण करेल. कालांतराने गाडी जीर्ण होते.

पेट्रोल, गॅसच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांच्या आयुष्याचा प्रश्न पूर्ण विरुद्ध आहे. यूएसमध्ये सध्या वीस लाखांहून अधिक ईव्ही रस्त्यावर आहेत. हे एकूण कारच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. एसअँडपीच्या मते, सध्या इव्हीचे सरासरी वय ३.६ वर्षे आहे. इलेक्ट्रिक कारच्या श्रीमंत मालकांकडे खर्च करण्यासाठी पैसे आहेत. म्हणूनच ते नवीन कार घेतात. तर ज्यांच्याकडे पैसे कमी आहेत ते चढे भाव आणि व्याजदरामुळे गप्प बसले आहेत. अमेरिकेत २८ कोटी ४० लाख वापरलेल्या कार आहेत आणि त्यांची संख्या दररोज वाढत आहे. वापरलेल्या कारचे सरासरी वय १२.५ वर्षे आहे. यापूर्वी कधीही जुन्या गाड्यांची संख्या इतकी नव्हती. तज्ज्ञांच्या मते ही स्थिती पर्यावरणासाठी चांगली नाही. रिसर्च ग्रुप एस अँड पी ग्लोबल मोबिलिटीच्या अलीकडील अभ्यासात यूएस मधील नवीन आणि वापरलेल्या कारबाबत काही ट्रेंड समोर आले आहेत. सलग सहाव्या वर्षी रस्त्यावर वापरलेल्या गाड्यांची संख्या वाढली आहे. साथीच्या आजारामुळे गेल्या तीन वर्षांत सर्वाधिक वाढ झाली आहे. संगणक चिप्सच्या कमतरतेमुळे पुरवठा प्रभावित झाला आणि वाहनांच्या किमती वाढल्या. पेट्रोल कारची सरासरी किंमत ३९ लाख रुपये आहे. व्याजदर वाढल्याने नवीन कारसाठी कर्जाचा दर ६% वाढला आहे. त्यामुळे नवीन गाड्यांची खरेदी प्रभावित झाली आहे.

२०२१मध्ये एक कोटी ४६ लाख नवीन कार विकल्या गेल्या. त्यांची विक्री २०२२ मध्ये सात लाखांनी घटून एक कोटी ३९ लाखांवर आली. गेल्या दहा वर्षांतील नवीन कार विक्रीतील ही सर्वात मोठी घसरण आहे. एस अँड पी ग्लोबल मोबिलिटीचे सहयोगी संचालक टॉड केम्पीयू म्हणतात की, अंडी, किराणा सामानापासून ते पेट्रोलपर्यंत सर्व गोष्टींच्या किमती वाढल्या आहेत. घर चालवण्याचा खर्च वाढल्याने लोकांकडे पैसे कमी पडत आहेत. त्यामुळे अनेकांना जुनी कार विकून नवीन कार घ्यायची नसते. नवीन कार विक्रीत घट झाल्याचा परिणाम वातावरणावर पडणार आहे. केम्पीयू म्हणतात, १२.५ वर्षांपूर्वी बनवलेली कार आधुनिक तंत्रज्ञान, कमी पेट्रोल, गॅस वापरणाऱ्या नवीन कारपेक्षा जास्त प्रदूषण करेल. कालांतराने गाडी जीर्ण होते.

१० वर्ष लागतील अर्ध्या कार बदलण्यासाठी १२.५ वर्ष आहे जुन्या गाड्यांचे आयुष्य ४८ लाख रु. आहे इलेक्ट्रिक कारचे मूल्य ३९ लाख रु. आहे गॅसोलीन कारचे मूल्य २८ कोटी आहे जुन्या कारची संख्या