आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Vi चे 2 नवीन स्वस्त प्लॅन लॉन्च:111 रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना मिळणार 31 दिवसांची वैधता, सोबतच कॉलिंग आणि डेटाचा आनंदही घेता येणार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वोडाफोन आयडिया म्हणजेच VI ने आपले दोन नवीन प्रीपेड प्लॅन जारी केले आहेत. कंपनीने लॉन्च केलेला हा प्लॉन सर्वात कमी किमतीचा म्हणजेच 107 आणि 111 रुपयांचा आहे. 107 रुपयांच्या पॅकमध्ये ग्राहकांना 30 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. तर 111 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 31 दिवसांचा कालवधी मिळणार आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये ग्राहकांना कॉलिंग आणि डेटाची सुविधा देखील मिळणार आहे. जानेवारी 2022 मध्ये ट्राईने टेलिकॉम कंपन्यांना एक महिन्याचा कालावधी पॅक लॉन्च करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

107 आणि 111 रुपयांच्या पॅकची माहिती

  • ग्राहकांना 107 रुपयांच्या पॅकमध्ये 107 रुपयांचे टॉकटाईम मिळणार आहे. त्यात व्हॉईस कॉलिंगसाठी प्रतिसेकंद 1 पैसा लागणार आहे. सोबतच या प्लॅनमध्ये 200 MB डेटा देखील मिळणार आहे. ज्याचा कालावधी 30 दिवसांचा असेल. मात्र, या प्लॅनमध्ये ग्राहकांना एसएमएसची सुविधा दिली जाणार नाही. कृपया याची ग्राहकांनी नोंद घ्यावी.
  • 111 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 111 रुपयांचा टॉकटाईम दिला जाणार आहे. व्हॉईस कॉलिंगसाठी या पॅकमध्येही प्रतिसेंकद एक पैसा लागणार आहे. सोबतच इंटरनेटचा आनंद घेण्यासाठी ग्राहकांना 200 MB डेटा देखील दिला जाणार आहे. या पॅकची कालावधी 30 ऐवजी 31 दिवस असणार आहे. एसएमएसची सुविधा देखील यामध्ये नसणार आहे. ग्राहकांना एसएमएससाठी वेगळे रिचार्ज करावे लागतील.
  • VI चा 99 रुपयांचा देखील एक प्लॅन आहे. ज्यात ग्राहकांना 99 रुपयांचा टॉकटाईम मिळतो. व्हॉईस कॉलिंगसाठी यात देखील प्रतिसेकंद एक पैसा लागतो. सोबतच 200 MB डेटासह 31 दिवसांचा कालावधी या प्लॅनमध्ये मिळते.

327 आणि 337 रुपयांचे दोन प्लॅनही केले लाँन्च

  • 327 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह 100 एसएमएस मिळतात. सोबत इंटरनेटचा आनंद घेण्यासाठी 25 GB डेटा देखील देण्यात येतो. या प्लॅनचा कालावधी देखील 30 दिवसांचा आहे. य़ासोबत ग्राहकांना चित्रपट आणि टीव्ही पाहण्यासाठी मोफत VI मुव्हीजचे सब्सक्रिप्शन देखील मिळते.
  • 337 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसह 100 एसएमएस देखील मिळतात. तसेच 28 GB डेटा देखील देण्यात येतो. या प्लॅनचा कालावधी देखील 31 दिवसांचा आहे. यासोबत देखील ग्राहकांना चित्रपट आणि टीव्ही पाहण्यासाठी मोफत VI मुव्हीजचे सब्सक्रिप्शन देखील मिळते.
बातम्या आणखी आहेत...