आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइन्स्टाग्रामने आता नवीन फिचर्सची घोषणा केली आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना नव्या प्रणालीचा चांगलाच फायदा होणार आहे. (content creators) निर्मात्यांना व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकताना त्या व्हिडिओचा कालावधी 15 मिनिटांपेक्षा कमी असेल तर तो रिल म्हणून शेअर करता येणार आहे. यासह फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना अॅपमध्ये अधिक पर्याय व रिलसाठी टेम्पलेट्स मिळणार आहे. तसेच रिलमध्ये व्हिडिओवर टिपणी जोडण्यासाठी पिक्चर-इन-पिक्चर पर्यायाचा देखील समावेश असणार आहे. येत्या आठवड्यात या नवीन फिचर्सचा समावेश होणार आहे.
ब्लॉगद्वारे केली घोषणा
इन्स्टाग्रामने एका ब्लॉगद्वारे ही घोषमा केली आहे. त्यात म्हटले की, Instagram वरील नवीन व्हिडिओ पोस्ट करताना ज्या व्हिडिओचा कालावधी 15 मिनिटांपेक्षा कमी आहे. ते येत्या आठवड्यात होणार्या बदलामुळे रिलवरही सामायिक शेअर करता येणार आहे. मेटा प्रायव्हेट प्लॅटफॉर्मने सांगीतले की, 'रिल्स इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तयार करण्यासाठी अधिक इमर्सिव्ह आणि मनोरंजक मार्ग असणार आहेत. सर्जनशील साधने आणि तुमच्या व्हिडिओ पोस्टवर पूर्ण-स्क्रीन अनुभवता येणार आहे. हे यातीलल वैशिष्ट्यस म्हणता येईल. या बदलापूर्वी पोस्ट केलेले व्हिडिओ हे व्हिडिओ म्हणूनच मानले जाणार आहेत. आणि ते रिलमध्ये समाविष्ट होणार नाहीत.
सद्यस्थितीत 90 सेकंदाची मर्यादा
सध्या, इन्स्टाग्रामवर 90 सेकंदांपेक्षा कमी कालावधीचे व्हिडिओ रील म्हणून शेअर केले जातात. Instagram देखील व्हिडिओ आणि Reels टॅब एकत्र करत आहे. याचा अर्थ Video आणि Reels एकाच टॅब अंतर्गत प्रवेश केला जाईल. रिल्समधील बदलाच्या व्यतिरिक्त, इंस्टाग्राम रीमिक्ससाठी आणखी नवीन पर्याय आणीत आहे. वापरकर्ते आता रील तयार करण्यासाठी ग्रीन स्क्रीन, होरीजॉन्टल किंवा व्हिर्टीकल स्प्लिट-स्क्रीन यासह विविध लेआउटमधून सार्वजनिक फोटोंमध्ये बदल (रिमिक्स) करता येतील. विद्यमान रिलमध्ये तुमची स्वतःची व्हिडिओ समायोजीत करताना तुम्ही चित्रांमधील दृश्य देखील निवडू शकता. याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना मूळ रीलमध्ये त्यांचे रिल जोडण्याचा पर्याय देखील असणार आहे. जेणेकरून ते क्रमशः प्ले होईल.
नवीन टेम्पलेट्सची उपलब्धता
इंस्टाग्राम नवीन टेम्पलेट्स देखील देणार आहे. ऑडिओ क्लिप प्लेस होल्डर्स प्रीलोड करून आणि फोटो किंवा व्हिडिओ क्लिप जोडून रील तयार करणे सोपे केली जाईल. हे टेम्प्लेट्स रोल आउट केल्यानंतर रील टॅबवरील कॅमेरा आयकॉनवर टॅप करून शोधले जाऊ शकतात. ड्युअल व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा पर्याय देखील आहे. म्हणजे फ्रंन्ट आणि बॅक कॅमेऱ्यांमधून एकाच वेळी शुटींग करता येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.