आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावीवोने आपला सर्वात कमी किंमतीचा नवीन लो बजेट स्मार्टफोन लॉन्च केले आहे. Y15s असे या मोबाईलचे नाव असून, त्या, ग्राहकांनी अतिशय चांगली सुविधा देण्यात आल्या आहेत. वीवोच्या या मोबाईलमध्ये ग्राहकांना वॉटरड्रॉप-स्टाइल नॉच डिस्प्ले, डुअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. हा मोबाईल गुगल अँड्राईड गो इडिशन या प्रणालीवर चालतो. या मोबाईलमध्ये ग्राहकांना 5000mAh ची दमदार बॅटरी दिली जाणार आहे. भारतीय बाजारात या मोबाईलटी टक्कर मोटोच्या E40 आणि रेडमीच्या 10 प्राइम या दोन मोबाईल सोबत होणार आहे.
वीवो Y15s ची किंमत
वीवोच्या या Y15s मोबाईलमध्ये आपल्याला 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज मिळणार आहे. त्याची किंमत कंपनीने 10,990 रुपये इतकी ठेवली आहे. या फोनमध्ये दोन कलर मिस्टिक ब्लू आणि वेव्ह ग्रीन असे दोन पर्याय देण्यात आले आहे. हा फोन ग्राहक वीवो इंडियाच्या ई-स्टोर आणि देशभरातील रिटेल स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करू शकता.
वीवो Y15s चे स्पेसिफिकेशन्स
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.