आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारात्री 8:09 वाजता अज्ञात क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर एक व्हिडिओ येतो. यामध्ये तुम्हाला 25 लाख रुपयांची लॉटरी लागली असल्याची गोष्ट सांगितली जाते. ही लॉटरी व्हॉट्सअॅप कडून मिळाली आहे, लॉटरी कशी लागली आणि त्याची रक्कम मिळवण्यासाठी काय करावे, याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. लॉटरी लागल्याची गोष्ट खरी आहे, यासाठी काही तथ्ये व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी बँक व्यवस्थापकाचा क्रमांकही दिला आहे. व्हॉट्सअॅपवर आलेला हा व्हिडिओ किती खरा आहे? व्हॉट्सअॅपवरून खरोखरच 25 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे का? यामध्ये देण्यात आलेला एसबीआय बँक व्यवस्थापक क्रमांक किती अचूक आहे? शेवटी, या व्हिडिओ मॅसेजचे संपूर्ण सत्य काय आहे? जाणून घ्या या बातमीत...
सर्वप्रथम व्हिडिओमध्ये काय सांगितले जात आहे आणि व्हिडिओवरील प्रतिमेवर काय लिहिले आहे? याचा अर्थ तुम्हाला सांगणार आहोत
व्हिडिओमध्ये असे म्हटले आहे: सर, मी व्हॉट्सअॅपच्या मुख्य कार्यालयातून फोन करीत आहे. मी नवी दिल्लीहून व्हॉट्सअॅप ग्राहक अधिकारी बोलत आहे. ज्या क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत आहात त्या नंबरवर व्हॉट्सअॅपकडून 25 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. या लॉटरीसाठी आंतरराष्ट्रीय लकी ड्रॉ काढण्यात आले होते. हे ड्रॉ भारत, नेपाळ, दुबई, जुनान आणि सौदी अरेबियामध्ये काढण्यात आले होते. यामध्ये तुमचा नंबर लॉटरी जिंकण्यात यशस्वी झाला आहे. यामध्ये जो क्रमांक दिसत आहे, तो स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबईच्या व्यवस्थापकाचा आहे. तुम्हाला हा नंबर फोनमध्ये सेव्ह करावा करुन व्हॉट्सअॅप कॉलवर बोलावे लागेल. हे तुम्हाला लॉटरीची रक्कम कशी मिळेल हे सांगतील. आपण या क्रमांकावर थेट कॉल करू शकणार नाही. लॉटरीचा नंबर विचारल्यावर त्यावर लिहिलेला नंबर सांगावा लागेल.
व्हिडिओच्या प्रतिमेतील संदेश: तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुमचा हा नंबर केबीसी विभागाकडून ऑल सिम लकी ड्रॉ मध्ये जिंकला गेला आहे. तुमचे आणि तुमच्या परिवाराचे अभिनंदन. लॉटरीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी राणा प्रताप सिंह, मुख्य कार्यालयाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर कॉल करून माहिती मिळवू शकता. दरम्यान, या संदेशात 9877739377 क्रमांक आणि लॉटरी क्रमांक 7287 देखील लिहलेले आहेत.
लॉटरी लागलेल्या संदेशाची तपासणी
आम्ही लॉटरी लागलेल्या या संदेशाची तपासणी करायला सुरुवात केली. 25 लाखांच्या या संदेशात किती तथ्य आहे, हे तपासण्यासाठी आम्ही प्राप्त झालेल्या क्रमांकावरून आणि संदेशात दिलेल्या क्रमांकावरून तपासणी सुरु केली. ज्या क्रमांकावरून हा संदेश आला तो +91 972230581 आहे. +91 असल्याने हा क्रमांक भारतातीलच आहे हे स्पष्ट होते. तर दुसऱ्या संदेशात 9877739377 या क्रमांकाचा उल्लेख करण्यात आला आहे. आम्ही हे दोन्ही क्रमांक ट्रुकॉलरच्या साहाय्याने तपासले. पहिल्या क्रमांक वोडाफोन आडियाचा असून तो किशन प्रकाश या व्यक्तीच्या नावे आहे. या क्रमांकाचे सध्याचे लोकेशन उत्तर प्रदेश दाखवण्यात येत आहे. तर दुसरा नंबर राणा प्रताप यांच्या नावाने असून हा जिओचा क्रमांक आहे, ज्याचे लोकेशन पंजाबमधून आले आहे.
आम्ही 972030581 वर फोन केला असता हा फोन एका मुलाने उचलला, ज्याने आपले नाव किशन असे सांगितले. किशनला व्हॉट्सअॅप मेसेजबद्दल विचारले असता त्याने असे कोणतेही मेसेज पाठवले नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे त्याला या संदेशाबद्दल काहीच कल्पना नाही. आम्ही दुसऱ्या 9877739377 क्रमांकावर फोन केला, त्याचे नाव राणा प्रताप दिसले. परंतु, हा क्रमांक बंद दाखवत होता. काही वेळानंतर आम्हाला पंजाबी भाषेतून हा नंबर बंद करण्याचा मॅसेज मिळाला. यावरुन हा क्रमांक पंजाबमधील आहे असे समजले.
आता समजून घ्या की, व्हिडिओमध्ये नंबर सेव्ह करून व्हॉट्सअॅपकॉलिंग करण्यास का सांगितले गेले?
यासंदर्भात टेक तज्ञ मनीष खत्री म्हणाले की, व्हॉट्सअॅप वापरकर्त्याला असा मेसेज येण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षापासून अनेक वापरकर्त्यांना असे मेसेज येत आहेत. जर कोणत्याही व्हॉट्सअॅप वापरकर्त्याला असा मेसेज आला तर त्यांनी त्वरित तो नंबर ब्लॉक करावा. फोनमध्ये सेव्ह करून कॉल करू नये. जर तुम्ही हा नंबर फोनमध्ये सेव्ह केला तर हॅकर्स तुमच्या फोनमध्ये डायरेक्ट इंट्री करु शकतात. हॅकर्स ट्रोजनद्वारे तुमच्या बँक खात्याचा तपशील मिळवून तुमचे संपूर्ण खाते रिकामे करु शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.