आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Tech auto
 • WhatsApp | Marathi News | Sticker | Now You Can Make Your Own Photo Sticker In WhatsApp, Learn Unique Sticker Tips

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये स्टीकर:भारीच! आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये बनवता येणार स्वत:च्या फोटोचे स्टीकर, जाणून घ्या स्टीकरच्या अनोख्या टीप्स

7 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

सोशल मीडियात आघाडीवर असलेला व्हॉट्सअ‍ॅपआपल्या ग्राहकांच्या आवडी-निवडीनुसार नेहमीच बदल करत असतो. व्हॉट्सअ‍ॅपने पुन्हा एकदा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपमध्ये स्वत:च्या फोटोचे स्टीकर देण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली होती.

अखेर व्हॉट्सअ‍ॅप कंपनीने त्या मागणीला मान्य करत आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये फोटो स्टीकर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कंपनीने काही टूल्स रिलीज केल्या आहेत. त्याद्वारे व्हॉट्सअ‍ॅप वेबमध्ये याचा आनंद घेता येऊ शकतो. या टूल्समध्ये फोटोला क्रॉप करण्यासह एडिट करण्याचे देखील पर्याय मिळणार आहे. त्या द्वारे आपल्या फोटोचे स्टीकर तयार करत एकमेकांना शुभेच्छा सुद्धा देता येऊ शकतात.

व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या स्टीकरसाठी कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅप्लिकेशनची गरज भासणार नाही. याआधी वापरकर्त्यांना फोटो क्रॉपिंग सारख्या अ‍ॅप्लिकेशनची मदत घ्यावी लागत होती. मात्र आता हे सर्व स्टीकरव्हॉट्सअ‍ॅपमध्येच मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयाव्हॉट्सअ‍ॅपचे नवीन स्टीकर कसे तयार करायचे...

स्टीकर टूल्स वापरण्याची प्रोसेस

 • सर्वात आधी web.whatsapp.com वर जाऊन व्हॉट्सअ‍ॅप लॉगिन करा.
 • या व्यक्तीला किंवा ग्रुपमध्ये तुम्हाला स्टीकर पाठवायचे आहे. त्याला ओपन करा.
 • ओपन केल्यानंतर स्माइली पर्यायावर क्लिक करत, स्टीकर टूल्सवर या.
 • स्टीकर टूल्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Create असे पर्याय मिळेल.
 • त्यानंतर हव्या त्या फोटो निवडा.
 • फोटो निवडल्यानंतर तुम्हाला वरती अनेक एडिट करण्याचे पर्याय मिळतील.
 • त्या स्टीकरवर आपण नवा स्टीकर, स्माइली, टेक्स्ट, पेंट, क्रॉप असे बदल करू शकतात.
 • त्यानंतर स्टीकर तयार झाल्यानंतर सेंड या पर्यायावर क्लिक करा.
 • आता तुमचे स्टीकर सेंड झाले असतील.
बातम्या आणखी आहेत...