आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • Whatsapp New Privacy Policy Implemented | All You Need To Know; News And Live Updates

​​​​​​​व्हॉट्सअ‍ॅपवर अज्ञात संदेशाचा वर्षाव:व्हॉट्सअ‍ॅपच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये दिसत आहेत कधीही सेव्ह केलेले नाहीयेत ते नंबर, पेमेंट फीचरही दिसत आहे वर

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पॉलिसीशी सहमत असल्यास येणार संदेश

व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांबाबत काही धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपने लागू केलेल्या नवीन पॉलिसीमुळे वापरकर्त्यांसोबत असे घडत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन पॉलिसीवरुन मोठा वाद सुरु होता. व्हॉट्सअ‍ॅप जबरदस्तीने आपली पॉलिसी वापरकर्त्यांवर लादत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता. तथापि, जोपर्यंत डेटा संरक्षण विधेयक कायदा बनत नाही, तोपर्यंत आम्ही ही पॉलिसी लागू करणार नाही असे व्हॉट्सअ‍ॅपने सांगितले होते. परंतु, वापरकर्त्यांना येत असलेल्या अज्ञात मॅसेजमुळे व्हॉट्सअ‍ॅपने ही पॉलिसी लागू केली आहे हे यावरुन सिद्ध होत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना विमा, क्रेडिट कार्ड, व्यवसायाचे मॅसेज सारखे येत आहेत. यामुळे वापरकर्त्यांना मोठा धक्का बसत आहे. विशेष जे नंबर कधीही आपल्या व्हॉट्सअ‍ॅप कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह केलेले नाहीत, ते नंबरही सेव्ह दिसत आहे.व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन धोरणाचे प्रतिबिंब आतापासून तुमच्या खात्यावर पडत आहे. यामुळे आपले काय नुकसान होऊ शकते, चला जाणून घेऊया...

पॉलिसीशी सहमत असल्यास येणार संदेश
जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप पॉलिसीशी सहमत असाल, तर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप खात्यावर असे मेसेजेस मिळतील. विशेष म्हणजे हे मॅसेज दररोज येतील आणि शेवटपर्यंत येतच राहतील. यामध्ये अज्ञात क्रमांकांचा समावेश असेल, कधीकधी पैसे बाजार सारख्या कंपन्यांकडूनही संदेश येतील. व्हॉट्सअ‍ॅप आपले नंबर व्यवसाय खाते असणाऱ्या वापरकर्त्यांना देत आहेत, यावरुन हे लक्षात येते. साध्या शब्दांत सांगायचे झाल्यास व्हॉट्सअ‍ॅप आपले नंबर विकत आहे.

उदाहरणासह समजून घ्या?
एका व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्याच्या खात्यावर पैसा बाजारचा संदेश येतो. या संदेशात एका बँकेचे क्रेडिट कार्डचे ऑफर दिले जात आहे. यासोबतच एक लिंक ही दिली जाते. दरम्यान, तुम्ही लिंकवर क्लिक करताच तुमच्या फोन नंबरसह त्या बँकेचे क्रेडिट कार्ड घेण्याचा पर्याय उघडेल. तुम्ही तुमच्या नंबरची पडताळणी करताच बँक तुम्हाला उर्वरित औपचारिकता पूर्ण करण्यास सांगेल. या प्रक्रियेदरम्यान, बँक आणि वापरकर्त्याचे इतर वैयक्तिक तपशील देखील तृतीय पक्षाकडे पोहोचत आहेत हे समजून घेणे खूप गरजेचे आहे.

व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटची नोटिफिकेशन येत आहे
व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना आता पेमेंट पर्याय सक्रिय करण्यासाठीच्या सूचना मिळू लागल्या आहेत. जेंव्हा आपण आपले व्हॉट्सअ‍ॅप उघडतो, तेव्हा सर्वात वर हे ऑप्शन दिसते. विशेष म्हणजे कंपनी या पर्यायाला क्रॉस करायचे ऑप्शन देखील देत आहे. परंतु, जेव्हा पुन्हा पुन्हा ते डोळ्यांसमोर येते, तेव्हा त्याला टच करण्याचा वापरकर्त्यांचा इच्छा होते.

यानंतर काय होते?
तुमच्या समोर नवीन पेमेंटच्या पर्यायासह पेमेंट स्क्रीन उघडते. पुढील स्क्रीनवर तुमच्या संपर्क यादीतील किती लोक व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट वापरत आहेत, हे व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला सांगेल. यानंतर व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला तुमची बँक जोडण्यास सांगेल. पेटीएम, फोनपे, गुगल पे किंवा इतर कोणत्याही डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मसारखी ही प्रकिया असेल. म्हणजेच, तुमची इच्छा नसताना ही तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटशी जोडले जाऊ शकता.

बातम्या आणखी आहेत...