आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • WhatsApp New Update । Now You Can Delete The Message Delete Anytime And Anywhere In WhatsApp

भारीच:आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये कधीही आणि केव्हाही करता येणार मॅसेज 'डिलीट', तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपला येणार लवकरच अपडेट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर आघाडीवर असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपनेहमी आपल्या ग्राहकांच्या आवडी-निवडीनुसार बदल करत असतो. आता देखील व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन बदल केले आहे. त्यात आता वापरकर्त्यांना स्टेटसमध्ये काही बदल पाहायला मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपमधील 'डिलीट फॉर एव्हरीवन' या पर्यायाला बदल करण्याची मागणी ग्राहकांनी केली होती. आता कंपनीने देखील आपल्या ग्राहकांची मागणी मान्य धरत स्टेटसमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे आता सेंड केलेले मॅसेज आता केव्हाही आणि कधीही डिलीट करता येणार आहे. सध्या कंपनीने याची लिमिट मात्र 68 मिनटे इतकीच ठेवली आहे. कंपनीने 'डिलीट फॉर एव्हरीवन' या फीचरला 2017 मध्ये आणले होते. त्यानंतर ग्राहकांनी टाईम लिमिटसाठीची मागणी केली होती. सध्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये 'डिलीट फॉर मी' आणि 'डिलीट फॉरस एव्हरीवन' हे असे दोन पर्याय मिळते.

टाईम लिमिट
सध्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आपण एखाद्याच्या मॅसेजला सेंड केल्यानंतर 4096 सेंकदात म्हणजे 68 मिनीटे 16 सेकंदात डिलीट करण्याचे पर्याय मिळत आहे. 2017 साली कंपनीने आपल्या ग्राहकांच्या मागणीनुसार मॅसेज डिलीट करण्याची प्रणाली आणली होती. मात्र त्यानंतर ग्राहकांनी त्याला टाईम लिमिट वाढवून देण्यात यावी अशी मागणी केली होती.

सुरूवातीला कंपनीने मॅसेजला डिलीट करण्यासाठी फक्त आठ मिनीटांचा कालावधी ठेवला होता. त्यानंतर वाढवून त्याची लिमिट वाढवण्यात आली होती. मात्र टेलीग्राम आणि इंस्टाग्रामवर ग्राहक कधीही आपल्या मॅसेजला डिलीट करू शकतो.

डिलीट फॉर एव्हरीवन कसे वापरावे

  • त्या संपर्काला किंवा ग्रुपला उघडा ज्यात तुम्ही मॅसेज केला आहे
  • या गोष्टीची नोंद घ्यावी की, तो मॅसेज 68 मिनटे16 सेंकदानंतरचा नसावा
  • आता त्या मॅसेजला दाबून धरा
  • वरती स्क्रीनवर दिलेल्या डिलीटच्या आयकॉनवर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्हाल दोन पर्याय मिळतील. त्यात डिलीट फॉर मी आणि डिलीट फॉर एव्हरीवन यात हवा तो पर्याय निवडा
बातम्या आणखी आहेत...