आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • WhatsApp Poll Feature Is Coming To WhatsApp, A Special Feature Related To Voting, Know How It Will Work

व्हॉट्सअ‍ॅप पोल फीचर:मॅसेजिंग अ‍ॅपवर लवकरच येणार मतदानासंबंधीत एक खास फिचर, ग्रुप्स चॅटवर करेल काम

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हॉट्सअ‍ॅप हे यूजर एक्सपीरियन्स उत्कृष्ठ बनवण्यासाठी वेळोवेळी आपल्या प्लॅटफॉर्मवर नवनवीन वैशिष्ट्ये जोडत राहते. यावेळी व्हॉट्सअ‍ॅप पोल नावाच्या फीचरवर काम केले जात आहे. याच्या मदतीने जेव्हा लोकांना एखाद्या गोष्टीबद्दल आपले मत द्यायचे असेल किंवा कोणत्याही विषयावर मत द्यायचे असेल. तेव्हा याचा वापर केला जाऊ शकतो.

टेलिग्रामवर हे फिचर आधीच उपलब्ध आहे
सध्या हे फीचर टेलिग्रामवर उपलब्ध होते. WABetaInfo या व्हॉट्सअॅपच्या अपकमिंग फीचरची माहिती देणार्‍या पेजनुसार, WhatsApp एका नवीन फीचर पोलवर काम करत आहे, जे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असेल. हे फीचर फक्त ग्रुप चॅटसाठी असेल, जिथे ग्रुप मेंबर्स मतदान करू शकतील.

पोलचा वापर फक्त गटांमध्ये केला जाऊ शकेल
व्हॉट्सअ‍ॅपचे आगामी फीचर फक्त ग्रुपमध्येच वापरता येणार असून फक्त त्या ग्रुपमधील सदस्यांनाच ते पाहता येणार आहे. गटाबाहेरील यूजर या पोलच्या मतदानात भाग घेऊ शकणार नाही. सध्या या वैशिष्ट्याबद्दल फारशी माहिती नाही. रिपोर्ट्सनुसार या फीचरला अ‍ॅप सर्वात पहिले iOS प्लॅटफॉर्मवर रिलीज करू शकते. नंतर ते Android आणि डेस्कटॉप यूजर्ससाठी प्रसिद्ध केले जाईल. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्समध्ये या फीचरचा चांगला उपयोग होऊ शकतो. विशेषतः जेव्हा लोकांना एखाद्या गोष्टीबद्दल मत बनवायचे असते किंवा कोणत्याही विषयावर मत द्यायचे असते.

एंड-टू-एंड एन्क्रिप्शन म्हणजे काय?
एंड-टू-एंड एन्क्रिप्शन मॅसेज पाठवणे आणि रिसव्ह करणाऱ्यांमध्ये कार्य करते. सेंडरने पाठवलेला संदेश एनक्रिप्ट होऊन कोडमध्ये रूपांतरित केला जातो, जो केवळ रिसीव्हर डिक्रिप्ट करु शकतो. यासोबतच पोल्समध्ये उत्तर देणाऱ्यांची ओळख सुरक्षित राहील.

व्हॉइस मॅसेज तुकड्यांमध्ये रेकॉर्ड करणारे फीचरही रोलआउट होईल
या व्यतिरिक्त व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक फीचर्स येणार आहेत. ज्यामध्ये मॅसेज रिप्लायचाही समावेश आहेत. या फीचरच्या मदतीने यूजर्स कोणत्याही मॅसेजवर इमोजीने रिप्लाय करु शकतील. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या अँड्रॉइड अ‍ॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये अजून एक फीचर टेस्ट करत आहे, ज्याच्यासह व्हॉइस म२सेजेसला तुकड्यांमध्ये रेकॉर्ड केले जाऊ शकेल.

यूजर्सला पहिले कोणताही ऑडियो मॅसेज पाठवण्यापूर्वी त्याला ऐकण्याचा ऑप्शन मिळतो, मात्र आता ते ऑडियो रेकॉर्ड करताना ते पॉज करु शकतील आणि बाकीचा ऑडियो नंतर रेकॉर्ड करु शकतील. असे फीचर iOS आणि डेस्कटॉप अ‍ॅप्समध्ये पहिलेच मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...