आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • WhatsApp । Will Now Have An Undo Button To Correct Errors In Status Updates, And Customers Will Be Able To Edit And Delete Statuses Quickly.

भारीच!:व्हॉट्सअँपवर आता स्टेटस अपडेट करताना झालेल्या चुकीला सुधारण्यासाठी मिळणार Undo बटन, ग्राहकांना स्टेटस पुन्हा इडिट आणि जलदगतीने डिलीटही करता येणार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडिया आघाडीवर असलेल्या कंपन्यापैकी एक असलेली व्हॉट्सअॅप आपल्या ग्राहकांच्या आवडी-निवडीनुसार नेहमी आपल्या फिचर्समध्ये सतत बदल करत असते. आता व्हॉट्सअॅपमध्ये पुन्हा एकदा ग्राहकांना नवीन फिचर्स पाहायला मिळणार आहे.

ग्राहकांना स्टेटस टाकण्याआधी आता फोटो इडिटींग करण्याचे ऑप्शन मिळणार आहे. यासाठी कंपनीचे काम सुरु असून, स्टेटसबरोबरच फोटो इडिटींग करतांना Undo आणि Redo हे दोन पर्यांय देखील ग्राहकांना दिले जाणार आहे. त्यामुळे स्टेटस टाकतांना झालेल्या चुकांना दुरुस्त करण्याचे पर्याय ग्राहकांना मिळणार आहे.

स्टेटस अपडेट झाल्यानंतर तात्काळ डिलीट करायला होणार मदत
व्हॉट्सअॅपच्या WABetaInfo नुसार, अनेकदा मोबाईलमधून चुकीचे स्टेटस पोस्ट होत असतात, त्याला डिलीट करण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यापार्श्वभुमीवर व्हॉट्सअॅपच्या नवीन फिचर्समध्ये ग्राहकांना स्टेटसखालीच Undo पर्यांय दिले जाणार आहे. हा पर्यांय Status Sent या पर्यांयखाली असणार आहे.

त्यामुळे सेंड झालेले स्टेटस ग्राहकांना काही काळ थांबवून त्यात सुधारणा करून किंवा थांबवता देखील येणार आहे. अनेकदा आपण पाहिले असेल की, आपल्या व्हॉट्सअॅपमधून चुकीचे फोटो किंवा व्हि़डिओ स्टेटसवर पोस्ट झालेले असतात.

स्टेटस लवकर हटवले जाणार
अनेकदा आपण पाहिले असेल की, आपल्याकडून चुकीचे मजकूर, फोटो किंवा व्हि़डिओ स्टेटसवर पोस्ट झाले असतात. त्यामुळे आपण त्याला तात्काळ डिलीट करण्यासाठी स्टेटसच्या खाली असलेल्या डिलीट पर्यांय निवडतो, त्यात सेलेक्शन केल्यापर्यंत आपल्या संपर्कातील कोणीतरी ते स्टेटस पाहिलेले असतात. अशातच कंपनी स्टेटसला जलदगतीने हटवण्यासाठी एक नवीन पर्यांय ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे. जेणेकरून लवकर-लवकर स्टेटस डिलीट होऊ शकेल.

नोटिफिकेशन देखील मिळणार
ग्राहकांनी व्हॉट्सअॅपमध्ये जाऊन चुकीचे पडलेले स्टेटस डिलीट केल्यानंतर त्यांना एक नोटिफिकेशन सुद्धा दिले जाणार आहे. त्यात आपण स्टेटस Undo केल्यामुळे डिलीट करण्यात आले आहे. असे कंपनीकडून पाठवण्यात येणार आहे. कंपनीने या नवीन फिचर्सची यशस्वीपणे चाचणी केली असून, लवकरच संपुर्ण जगातील ग्राहकांना याचा लाभ घेता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...