आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोशल मीडिया अॅप व्हॉट्सअॅपवर बऱ्याचदा आपल्याला एखाद्या ग्रुपमध्ये अॅड करण्यात येते. विशेष म्हणजे आपण जॉईन झालेल्या ग्रुपमधील एकही व्यक्ती आपल्या ओळखीची नसते. मात्र, या ग्रुपमध्ये सहभागी असलेले इतर व्यक्ती तुमचा नंबर पाहू शकता किंवा ते तुमचा नंबर सेव्ह देखील करू शकता. मात्र, आता व्हॉट्सअॅप एका नवीन फिचर्सवर काम करत आहे. ज्याद्वारे ग्रुपमधील इतर व्यक्ती तुमचा नंबर पाहू शकणार नाही.
व्हॉट्सअॅपचे हे फिचर डेव्हलपमेंट स्टेजवर असून लवकरच टेस्टिंगनंतर ते स्थिर व्हर्जनसाठी रिलीज केले जाईल. व्हॉट्सअॅपच्या या आगामी फिचर्सची माहिती व्हॉट्सअॅपच्या आगामी फीचर्सचा मागोवा घेणाऱ्या WabiInfo या वेबसाइटने शेअर केली आहे.
ट्विटरव्दारे दिली माहिती
ही माहिती वाबीटाइंफोनने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे. ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे की, व्हॉट्सअॅपच्या या आगामी फिचरवर सध्या काम सुरू आहे. त्या फिचरचे नाव हायडिंग फोन नंबर असे आहे. हा फिचर तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड झाल्यानंतर वापरता येईल.
वॉईस मॅसेजवरही काम सुरू
आपल्या ग्राहकांसाठी व्हॉट्सअॅप वेळोवेळी बदल करून अपडेट देत असतो. नुकतेच एक ट्विट करत व्हॉट्सअॅपने घोषणा केली आहे की, आम्ही आणखी एक फिचर ग्राहकांसाठी आणणार आहोत. ज्याच्या मदतीने वापरकर्ते वॉईस मॅसेजलाही अतिशय सोप्या पद्धतीने वापरू शकता. ज्यामध्ये वापरकर्त्यांना स्टोरीला फास्ट आणि स्लो पद्धतीने ऐकण्याचे पर्याय मिळणार आहे. यासोबत या फिचरमध्ये वॉईस रिकार्ड आणि पॉज म्हणजेच थांबवण्याचे देखील पर्याय मिळतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.