आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टेकआर्कचा अहवाल :कोराेनानंतरही विकतील 12.7 कोटी स्मार्टफोन, 2019 च्या तुलनेत 12.5% कमी होईल विक्री

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या वर्षी 14.5 कोटी स्मार्टफोन विकले होते

कोरोना संकटामुळे पुरवठा आणि मागणीवर परिणाम झाल्यावरही या वर्षी देशात १२.७ कोटी स्मार्टफोन विकले जातील. मात्र, या वर्षी १६.२ कोटी स्मार्टफोन विकण्याचा अंदाज होता. मार्केट रिसर्च फर्म टेकआर्कने मंगळवारी स्मार्टफोनशी संबंधित आपला अहवाल जारी केला आहे. या वर्षी विक्रीचा अंदाज वर्षाच्या सुरुवातीस जारी अंदाजापेक्षा २१.६ टक्के कमी आहे. अहवालानुसार, २०१९ च्या तुलनेत या विक्रीचा अंदाज १२.५ टक्के कमी आहे. गेल्या वर्षी १४.५ कोटी स्मार्टफोन विकले होते. भारतात उत्पादन आणि विक्री दोन्हीच्या दृष्टीने स्मार्टफोन उद्योगावरील वाईट वेळ टळली आहे. 

कंपन्या आता पुन्हा रुळावर येण्यासाठी नव्या रणनीतीसह पुढे जातील. नव्या प्रयोगाऐवजी ग्राहकांसाठी जास्तीत जास्त उपयोगी होण्यावर भर दिला जाईल. बेसिक आणि मध्यम किंमत श्रेणी(५००१ रु. ते २५,००० रुपयांपर्यंत) एकूण श्रेणीच्या ९२ टक्के असेल. दुसरीकडे, अँटिलेव्हल सेगमेंट(५००० रु.पर्यंत) घसरण राहील आणि प्रीमियम सेगमेंट कमीत कमी प्रभावित राहील. प्रत्येक युजर अनिश्चिततेच्या या काळात जास्त बचत करू इच्छितो. अहवालानुसार, टॉप फाइव्ह स्मार्टफोन ब्रँडवर कोरोना संकटाचा किरकोळ परिणाम होईल. लहान ब्रँडला सर्वात जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे.

0