आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2021 मधील इनोव्हेशन्स:दोन वेळा टक-टक केल्यास फ्रिजचा दरवाजा होणार पारदर्शक; -5 ते +2 नंबरसाठी एकच चष्मा लागणार

लास वेगास3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाकाळात जगातील सर्वात मोठा टेक्नॉलॉजी शो लास वेगासमध्ये प्रथमच आॅनलाइन

जगातील सर्वात मोठा टेक शो कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (सीईएस) सोमवारी लास वेगासमध्ये सुरू झाला. तो १४ जानेवारीपर्यंत चालेल. शोला दरवर्षी २ लाख लोक भेट द्यायचे. मात्र यंदा काेरोनामुळे तो प्रथमच ऑनलाइन होत आहे. आंतरराष्ट्रीय टेक कंपन्या विविध पत्रपरिषदा घेऊन आपली उत्पादने सादर करत आहेत. ती यंदाच बाजारात येतील. पहिला सीईएस जून १९६७ मध्ये न्यूयॉर्कमध्ये झाला होता. तेव्हापासून दरवर्षी हजारो उत्पादनांची घोषणा केली जाते. यंदाच्या शोमधील काही घोषणा पुढीलप्रमाणे...

लॅपटॉप
लेनोव्होच्या लॅपटॉपचा डिस्प्ले सॅमसंगने तयार केला आहे. स्क्रीन ७०% पर्यंत ब्ल्यू लाइट घटवते. कडक उन्हातही लॅपटॉपचा वापर करता येतो.

डॉगला पाहताच दरवाजा उघडेल, अॅपद्वारेही कंट्रोल
माइक्यू कंपनीने ब्ल्यूटूथवर चालणारे डॉगी डोअर लाँच केले. श्वानाच्या गळ्यातील ब्ल्यूटूथ बँडने तो समोर येताच दरवाजा आपोआप उघडेल. किंमत २.१५ लाख रुपये आहे.

टॉयलेट सीट देणार सल्ला; सॅलड-पालेभाज्या खाव्यात
युजरचे आरोग्य तपासणारे टॉयलेट सीट एका जपानी कंपनीने तयार केले आहे. त्यातील सेन्सर शरीर आणि विष्ठेला स्कॅन करून कमतरतेनुसार जीवनशैली बदलण्याचा सल्ला देते.

रोलरद्वारे चष्म्याचा नंबर करता येणार अॅडजस्ट
या चष्म्यात -५ ते +२ पर्यंत फोकस सेट करता येतो. यामुळे नंबर कमी-जास्त झाल्यास चष्मा बदलणे किंवा एकापेक्षा जास्त चष्मे बाळगण्याची गरज नाही. किंमत ६००० रुपये आहे.

पारदर्शक डोअरमधून काय संपले आहे ते पाहता येईल
एलजी इन्स्टाव्ह्यू रेफ्रिजरेटर आणत आहे. दरवाजावर दोनदा टक-टक केल्यास तो पारदर्शक होतो. बर्फही वेगवेगळ्या पद्धतीने तयार करता येतो. नोझलमध्ये ऑटो क्लीन आहे.

बातम्या आणखी आहेत...