आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

युजफूल अ‍ॅप:फिजिकल डिस्टन्सिंगसाठी महत्त्वाचे 3 अ‍ॅप्स 

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फिजिकल डिस्टन्सिंगसाठी महत्त्वाचे 3 अ‍ॅप्स

जगभरात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता शारीरिक अंतराचे महत्त्व सर्वांनाच कळायला लागले आहे. परंतु, कधीकधी आपण घराबाहेर पडताना याचे पालन करणे अवघड होते. अशा परिस्थितीत, केवळ देशातच नव्हे तर जगभरात असे अनेक उपयुक्त अ‍ॅप्स विकसित केले गेले आहेत. जे तुम्हाला वेळोवेळी सूचना देऊन लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवण्यास मदत करतात. यापैकी आरोग्य सेतू हे नाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. ब्ल्यूटूथ आणि लोकेशनच्या मदतीने हे अ‍ॅप वापरकर्त्यांना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले आहे की नाही ते सांगते. त्याचप्रमाणे, बाजारात इतर काही अ‍ॅप्स उपलब्ध आहेत जे तुम्हाला अनेक उपयुक्त वैशिष्ट्ये प्रदान करत आहेत. अशा तीन अॅप्सबद्दल जाणून घ्या आणि आपल्या आवडीनुसार एखाद्या अॅपची निवड करा.

तुमच्या चारही बाजूने एआर रिंग तयार करते गुगलचे सोडार
गुगलद्वारे अँड्रॉइडसाठी लाँच केलेले हे फिजिकल डिस्टन्सिंग अ‍ॅप क्रोम ब्राउझरद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अ‍ॅपचे वैशिष्ट्य म्हणजे ते ऑगमेंटेड रिअॅलिटीच्या मदतीने वापरकर्त्याच्या भोवती दोन मीटरच्या परिघाची एक रिंग तयार करते. जेणेकरुन ते शारीरिक अंतराच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करू शकतात. हे वेबएक्सआर तंत्रज्ञानाच्या मदतीने करू शकते. इतर अ‍ॅप्ससारखे नाही. तुम्हाला तुमच्या फोनमध्ये काहीही इन्स्टॉल करण्याची आवश्यकता नाही किंवा आपल्या सभोवतालच्या इतरांच्या फोनमध्येही इन्स्टॉल करण्याची आवश्यकता नाही.

फिजिकल डिस्टन्सिंगचे स्कोअरिंग
हे एक कम्युनिटी आधारित वैयक्तिक सुरक्षा साहाय्य आणि शारीरिक अंतर अ‍ॅप आहे. जे वापरकर्त्यांना दोन मीटरच्या परिघात येताच सतर्क करते. येथे वापरकर्त्यांना त्यांच्या शारीरिक अंतर पद्धतीचा नियमित अहवाल देखील मिळतो. एवढेच नव्हे तर अ‍ॅप वापरकर्त्यांना त्यांच्या शारीरिक अंतरावर आधारित स्कोअर देखील देईल. हे तुम्हाला २४x७ आपत्कालीन हेल्पलाइनची सुविधा देते. याद्वारे तुम्ही बटण दाबून पॅनिक अलर्ट पाठवू शकता. दुसरीकडे, ट्रॅक युअर फॅमिलीसारख्या उपयुक्त फीचरद्वारे जीपीएसच्या मदतीने वापरकर्त्याचे कुटुंब, त्यांचे लोकेशन ट्रॅक करू शकते. याशिवाय देशातील बऱ्याच राज्यांत रुग्णवाहिका सेवाही पुरविल्या जातात.

व्हायब्रेशनने मिळते सूचना
युनायटेड नेशन्स टेक्नॉलॉजी इनोव्हेशन लॅबद्वारे विकसित केलेले हे अ‍ॅप तुम्हाला सभोवतालच्या मोबाइल डिव्हाइसला स्कॅन करते आणि डिव्हाइस तुमच्या १.५ मीटरच्या परिघात प्रवेश करताच तुम्हाला त्वरित सूचित करते. तुम्हाला सूचना देण्यासाठी हे अ‍ॅप व्हायब्रेशन आणि चित्राची मदत घेते. यात तुम्हाला योग्य अंतर राखण्यास सांगितले जाते. तुम्ही हे क्षेत्र १.५ मीटरपासून ते २.५ मीटरपर्यंत देखील वाढवू शकता. ब्लूटूथची मदत घेणाऱ्या या अ‍ॅपमध्ये कुटुंब आणि मित्रांचे मोबाइल व्हाइट लिस्ट केले जाऊ शकतात. म्हणजे तुमचा मोबाइल त्यांच्या जवळपास गेल्यावर व्हायब्रेट होणार नाही. तुमचा कोणताही वैयक्तिक डेटा कलेक्ट किंवा स्टोअर केला जात नाही, असा या अ‍ॅपचा दावा आहे.