आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एआय टूलद्वारे होणार सर्दीचे निदान:सूरतमधील संशोधकांच्या चाचणीला यश, सुटीसाठी आजारपणाचा बहाणा करणाऱ्यांची होईल अडचण!

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरतमधील सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीतील संशोधकांनी सर्दीच्या निदानासाठी एआय टूलचा यशस्वीरित्या वापर केल्याचा दावा करण्यात आला आहे. संस्थेतील संशोधकांनी केलेल्या एका ताज्या अभ्यासात, व्यक्तीच्या आवाजाच्या पॅटर्नवरून सर्दीचे यशस्वीरित्या निदान करण्यात आले आहे. हार्मोनिक्सवर आधारित असलेल्या या तंत्रज्ञानात सर्दीचे निदान करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

निदानात 70% अचूकता

संशोधकांनी मशीन लर्निंग अल्गोरिदमचा वापर करून अभ्यासात सहभागी झालेल्यांच्या आवाजाच्या पॅटर्नचा अभ्यास करून सर्दीचे निदान केले. या निदानात 70% अचूकता दिसून आली. एकूण 630 जणांवर हा अभ्यास करण्यात आला. यातील 111 जणांना सर्दीचे निदान झाल्याचे निष्पन्न झाले. हे निदान करण्यासाठी या लोकांच्या व्होकल पॅटर्नचे विश्लेषण एआयच्या मदतीने करण्यात आले. यात हार्मोनिक्स म्हणजेच व्होकल रिदमचा वापर करण्यात आला.

अशी झाली चाचणी

या चाचणीदरम्यान लोकांना एक ते चाळीसपर्यंत अंक मोजणी तसेच काही कथा वाचण्यास सांगण्यात आले होते. या चाचणीत 70% अचूकता दिसून आली. डॉक्टरांकडे न जाता केवळ आवाजावरून मशीन लर्निंगच्या माध्यमातून सर्दीचे निदान करणे हा या अभ्यासाचा उद्देश होता. त्यामुळे आवाजावरून सर्दीचे निदान करणाऱ्या या नव्या टूलमुळे भविष्यात खोट्या आजारपणाचा बहाणा करणे अडचणीचे ठरू शकेल असेच सध्या दिसत आहे. विशेषतःआजारी असल्याचे खोटे सांगून सुटी घेणाऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान अडचणीचे ठरू शकते असे बोलले जात आहे.