आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकामाच्या ठिकाणी घड्याळाची टिकटिक नेहमीच तणाव निर्माण करते. परंतु आता मनगटावर बांधले जाणारे बिनाकाट्यांचे नोवॉच घड्याळ तणावाचा स्तर वाढण्यापूर्वी एक तास आधीच तुम्हाला सावध करेल. हे नोवॉच स्ट्रेस हार्माेन कॉट्रिसोलला घामाद्वारे ओळखेल. जर शरीरात कॉर्टिसोलचा स्तरव वाढला तर हे डिव्हाइस तुमच्या मनगटावर व्हायब्रेशन करू लागेल. सोबतच ऑडिओद्वारे सल्ला देईल की आता दीर्घ श्वास घ्या, कामाच्या ठिकाणावरून उठून थोडे चालायला लागा. वास्तविक कॉर्टिसोलचा स्तर लठ्ठपणा, अनिद्रा आणि हृदयाशी संबंधित आजारांचे कारण असतो. कॉर्टिसोल स्तर वाढल्यानंतर मनगटाला आलेल्या घामाद्वारे नोवॉच ट्रॅक करेल.
नोवॉचमध्ये लावलेले इलेक्ट्रिकल सेन्सर डेटा अल्गोरिदमसोबत तणावाचे विश्लेषण करेल. नोवॉचच्या निर्मात्याच्या मते एका संशोधनात समोर आले की, जर तणावाचा स्तर डिजिटल पद्धतीने संख्येच्या आधारावर डिस्प्ले केला गेला तर तोही तणावाचा स्तर वाढवतो. त्यामुळे नोवॉचमध्ये डिस्प्ले फीचर ठेवले गेले नाही. ते आरोग्याचा डेटा सेव्ह करते. परंतु वापरकर्त्याला त्वरित दाखवत नाही. लास वेगासमध्ये होणाऱ्या सीईएस कॉन्फरन्समध्ये त्याचे प्रदर्शन ठेवले जाईल. सुमारे ५७ हजार रुपयांचे नोवॉच पुढील वर्षी मार्चपर्यंत बाजारात येईल. नोवॉचला कारच्या डॅशबोर्डशीही कनेक्ट करता येईल. त्यामुळे ड्रायव्हिंग करतानाही तणावाचा स्तर कळेल.
गाजलेला चित्रपट ‘डोंट लूक अप’मध्येही असेच डिव्हाइस
नेटफ्लिक्सवर नुकताच चर्चेत आलेला चित्रपट “डोंट लूक अप’मध्येही स्ट्रेस मॉनिटर डिव्हाइस दाखवण्यात आले आहे. नोवॉचच्या डायलमध्ये जेमस्टोन लावला आहे. त्याखाली इलेक्ट्रोडर्मल सेन्सर लावण्यात आले. नोवॉच तणावाचा स्तर तपासण्यासाठी शरीराचे तापमान, हृदयगती, रक्तातील ऑक्सिजन आणि श्वासाच्या गतीलाही मॉनिटर करते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.