आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tech auto
  • Tech
  • Android 11: Apps Will Launch 20% Faster, Screen Recording Will Be Easier; Know What's Special In New Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहुप्रतीक्षित अँड्रॉयड 11 अपडेट आले:आधीपेक्षा 20% ज्यास्त स्पीडने अॅप लॉन्च होणार, जाणून घ्या नवीन अपडेटमध्ये कोणत्या सुविधा मिळतील

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेसबुक मेसेंजरप्रमाणेच प्रत्येक चॅट अॅपचे बबल सुरू होणार, कोणत्याही स्क्रीनवर चालू राहील चॅटिंग

फेब्रुवारीमध्ये घोषणा केल्यानंतर अखेर अँड्रॉइड 11 मंगळवारी लॉन्च करण्यात आले आहे. सुरुवातीला हे अपडेट फक्त गूगलच्या पिक्सल स्मार्टफोनसाठी उपलब्ध असेल आणि येणाऱ्या काही दिवसात इतर मोबाईल यूजरलाही मिळले. यात आघाडीवर ओप्पो, शाओमी, वन प्लस, रिअलमी, नोकियासारख्या कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या नवीन हँडसेटमध्ये अँड्रॉइड 11 चे प्री इंस्टॉल्ड अपडेट असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार अँड्रॉइड 11 आधीपेक्षा 20 टक्के जास्त स्पीडने अॅप लॉन्च करेल.

जाणून घ्या अँड्रॉयड-11 च्या नवीन फीचर्सबद्दल

1. स्क्रीन रेकॉर्डिंग

स्क्रीन रेकॉर्डिंग फीचर स्क्रीनशॉटप्रमाणे आहे, यात यूजर मोबाईल स्क्रीनवर चाललेल्या सर्व मूव्हमेंटला रेकॉर्ड करते. हे फीचर आधीपासूनच अनेक स्मार्टफोनमध्ये आहे. परंतू, या अपडेटनंतर प्रत्येक अँड्रॉयड फोनमध्ये हे फीचर उपलब्ध असेल.

2. बोलण्याचा नवीन पर्याय

अँड्रॉइड 10 मध्ये जेव्हा तुम्ही स्क्रीनवर खाली स्वाइप करता, तेव्हा नोटिफिकेशन बार खाले येतो. अँड्रॉयड 11 मध्ये तुम्ही हे नोटिफिकेशन बार दोन भागात वाटू शकता. पहिल्या भागात तुमचे नोटिफिकेशन असेल, तर दुसऱ्या(कनवर्जेशन)भागात चॅट असेल. कनवर्जेशन भागात वॉट्सऐप, मेसेंजर आणि ट्विटरसारख्या अॅपचे नोटिफिकेशन असेल.

3. नवीन कंट्रोल्स

स्मार्ट होम डिवाइस: अँड्रॉइड 11 चे काही फीचर्स त्या लोकांना कामी येतील, जे घरुनच एसी, फ्रिज आणि टीवीसारख्या डिव्हाइसला कंट्रोल करतात.

4. म्यूजिक कंट्रोल

ऑपरेटिंग सिस्टीमला नवीन व्हर्जनमध्ये अपडेट केल्यानंतर ब्लूटूथ स्पीकर किंवा दुसऱ्या डिवाइसवर गाणे ऐकणे सोपे जाईल. तुम्ही एअरप्लेन मोड ऑन ठेवल्यावरही तुमच्या फोनचे ब्लुटूथ सुरुच राहिल.

5. अँप्स सांभाळण्याचा त्रासापासून सुटका

अँड्रॉइड 11 अपडेटच्या आधी तुम्हाला अॅप्स एखाद्या ठिकाणी ठेवायचे असेल, तर एक फोल्डर बनवावे लागत होते. अँड्रॉइड 11 च्या स्मार्ट फोल्डरच्या मदतीने फोन आपोआप एकसारख्या अॅप्सला एका ठिकाणी ठेवेल.

6.सेक्योरिटी आणि प्रायवसीमध्ये फायदे

नवीन अँड्रॉइड अपडेटनंतर कोणत्याही अॅपला तुम्ही फक्त एकदा लोकेशन परमिशन देऊ शकता. यापूर्वी कोणत्याही अॅपला परवानगी देताना दोन ऑप्शन (ऑल द टाइम) आणि (ओनली वाइल यूजिंग अॅप) यायचे.

बातम्या आणखी आहेत...