आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅप्पलला भारतीयाने लावला 138 कोटींचा चुना:अमेरिकेत 3 वर्षे कैदेसह 155 कोटी दंडाची शिक्षा; धीरेंद्र प्रसाद असे नाव

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टेक विश्वातील दिग्गज कंपनी अ‍ॅप्पलला एका भारतीय व्यक्तीने तब्बल 138 कोटींचा चुना लावला आहे. धीरेंद्र प्रसाद असे या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी त्याला 3 वर्षे कैद आणि 155 कोटी दंडाची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे.

अमेरिकेच्या अ‍ॅटर्नी कार्यालयाने याविषयी एक प्रेस रिलीज जारी केली आहे. यानुसार 55 वर्षीय धीरेंद्र प्रसादला अल‍ॅप्पलच्या फसवणुकीच्या प्रकरणात 2022 मध्ये आरोपी बनवण्यात आले होते. धीरेंद्रने या प्रकरणी गुन्ह्याची कबुली दिली आहे. कंपनीची फसवणूक आणि कर चोरीमध्ये दोन व्हेंडर कंपन्यांसोबत काम केल्याची कबुली धीरेंद्रने दिली आहे.

या प्रकरणात करचुकवेगिरी प्रकरणी 15 कोटींच्या भरपाईचे आदेश कोर्टाने धीरेंद्रला दिले आहे. तसेच 44 कोटींपेक्षा जास्त रुपयांची मालमत्ता जप्त करण्यासह 65 कोटी रोख देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

2008 ते 2018 दरम्यान अ‍ॅप्पलमध्ये नोकरी

धीरेंद्र हा 2008-2018 दरम्यान अ‍ॅप्पलमध्ये नोकरीला होता. कंपनीच्या ग्लोबल सर्व्हिसेस सप्लाय चेनमध्ये खरेदीदार म्हणून तो कार्यरत होता. व्हेंडरकडून फोनचे पार्ट खरेदी करण्यासह अनेक कामांची जबाबदारी त्याच्यावर होती.

धीरेंद्रवरील आरोप

  • धीरेंद्रने कंपनीला न मिळालेल्या उत्पादनांसाठी पेमेंट घेतले
  • धीरेंद्रने पार्टसची चोरी करत इन्व्हॉईसही वाढवून दाखवले
  • कंपनीचे जुने वॉरंटीत असलेले प्रॉडक्टस तो खरेदी करायचा
  • यासाठी त्याने दोन कंपन्यांसोबत डील केली होती
  • कंपनीची फसवणूक करून कमावलेल्या संपत्तीवर त्याने कर भरला नाही