आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ‍ॅपलची आयफोन-12 सिरीज लाँच:प्रथमच 5-जी; 12-मिनी हे मॉडेल जगातील सर्वात स्लिम-हलका स्मार्टफोन असल्याचा दावा, किंमत 69,900 रु. पासून

कॅलिफोर्निया3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अ‍ॅपलने दुसऱ्या ऑनलाइन इव्हेंटमध्ये सादर केले चार नवे मॉडेल, पाच रंगांत उपलब्ध

अ‍ॅपलने मंगळवारी रात्री उशिरा आयफोन-१२च्या मालिकेत चार मॉडेल लाँच केले. कोरोनामुळे एक महिना उशिरा हे लाँचिंग झाले. आयफोन १२, १२ प्रो, आयफोन १२ प्रो मॅक्स आणि आयफोन १२ मिनी यांचा नव्या मॉडेलमध्ये समावेश आहे. आयफोन १२ मध्ये ६.१ इंच स्क्रीन, तर आयफोन १२ मिनीमध्ये ५.४ इंच डिस्प्ले आहे. हा जगातील सर्वात स्लीम, छोटा व वेगवान ५-जी फोन असल्याचा कंपनीचा दावा आहे. हा आयफोन ११हून ११% स्लिम, १५% लहान व १६% हलका आहे.

सिरॅमिक शील्डचे संरक्षण, उत्तम वायरलेस चार्जिंगसाठी मॅगसेफ तंत्रज्ञानाचा वापर
आयफोन १२ मध्ये अ‍ॅल्युमिनियम फ्रेम फ्लॅट एज आहेत. हे सिरॅमिक शील्डसह असतील. पडल्यानंतरही फोन सुरक्षित राहील. तो काळा, पांढरा, निळा, लाल आणि हिरव्या रंगांत लाँच झाला आहे. फोनमध्ये सुपर रेटिना डिस्प्ले स्क्रीन आहे. त्याचे रिझोल्यूशन 2532x1170 पिक्सेल आहे. त्याची स्क्रीन २८ लाख कलर्स सपोर्ट करते. ५ जी कनेक्टिव्हिटीसाठी कंपनीने आयओएस ऑप्टिमाइझ्ड केली आहे. नवा आयफोन सुमारे १५ टेलिकॉम कंपन्यांच्या ५जी नेटवर्कशी सुसंगत असेल. फोनमध्ये ए-१४ बायोनिक चिप आहे. उत्तम चार्जिंगसाठी मॅगसेफ तंत्रज्ञान दिले आहे. आयपॅड एअरमध्येही कंपनीने ही चिप वापरली होती. कंपनीचा दावा आहे की नेटवर्क आयडियल स्थितीत असताना त्याची कमाल डाऊनलोड स्पीड ४ जीबीपीएसपर्यंत असेल. आयफोन १२ च्या ड्युुअल कॅमेऱ्यांत अल्ट्रावाइड, नाइट मोडसह इतर फीचर्स आहेत.

होम पॉड मिनी स्पीकर : हा स्मार्ट स्पीकर आयफोनसोबत कनेक्ट होतो. म्हणजेच त्याद्वारे आयफोन वापरला जाऊ शकेल. यात टच कंट्रोल देण्यात आले आहेत. त्याची किंमत ९९०० रुपये असेल. तो २३ नोव्हेंबरपासून मिळेल.
- आयफोन १२ मिनी आणि आयफोन १२, ६४ जीबी, १२५जीबी व २५६ जीबी मॉडेलमध्ये मिळेल.
- भारतात त्याची किंमत ६९,९०० ते ७९,९०० च्या दरम्यान असेल. तो ३० ऑक्टोबरपासून मिळेल.
- आयफोन १२ प्रो आणि आयफोन 12 प्रो मॅक्स १२८ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबी व्हेरिएंटमध्ये ग्रॅफाइट, सिल्व्हर, गोल्ड आणि पॅसिफिक ब्ल्यू रंगात. त्यांची किंमत १,१९,९०० ते १,२९,९०० दरम्यान.
भारतात 30 पासून मिळेल, किंमत 69,900 रु. पासून

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser